ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीची  सुनावणी पुन्हा तहकूब
सार्वमत

ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीची सुनावणी पुन्हा तहकूब

Arvind Arkhade

टिळकनगर|वार्ताहर|Tilaknagar

मुसळधार पाऊस आणि ठिकठिकाणी पाणी साठल्यामुळे मुंबई पुन्हा एकदा संथ झाली आहे. याचा परिणाम उच्च न्यायालयात होणार्‍या ग्रामपंचायत प्रशासकीय नेमणुकीच्या वादावर होणार्‍या सुनावणीवर झाला असल्याने कालही खंडपीठाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांसमोर दाखल झालेल्या याचिकांवर सलग दोन दिवसांपासून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या खंडपीठासमोर सुनावणी निश्चित करण्यात आली होती.

मात्र मुसळधार पावसाचा व्यत्यय येत असल्याने न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष ठेऊन असणार्‍यांना आणखी दोन किंवा तीन दिवसांची वाट पहावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई खंडपीठासमोर सुमारे 21 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com