ग्रामपंचायतींना 40 कोटींचा निधी

15 वा वित्त आयोगाचा अबंधित निधीचा पहिला हप्ता
ग्रामपंचायतींना 40 कोटींचा निधी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारकडून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्रिस्तरीय ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्तीय वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये अबंधित / अनटाईड ग्रँडचा पहिला हप्ता रुपये 726.41 कोटी वितरित करण्यात आला आहे. त्यात नगर जिल्ह्यासाठी 40 कोटी 50 लाखांचा निधीचा समावेश आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतींना एकूण निधीच्या 80 टक्के, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना प्रत्येकी 10 टक्के निधीची वाटप करण्यात येते.

सन 2022-23 या आर्थिक वर्षापासूनच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या वितरीत निधीतून पंचायतराज संस्थांनी ग्रामपंचायत विकास आराखड्यानुसार कामे व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावयाची आहे. गावातील सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करून गावांच्या गरजाची निश्चिती करून कामे ठरविण्याचे अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतीला आहेत.

डिसेंबरअखेर 50 टक्के निधी खर्च अनिवार्य

या निधीतून डिसेंबर 2022 अखेर 50 टक्के खर्च होणे आवश्यक आहे. 50 टक्के खर्च झाल्याशिवाय केंद्रीय वित्त आयोगाकडून पुढील हप्त्याचे वितरण केले जाणार नाही.

प्रशासक असलेल्या संस्थांना निधी नाही

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ज्या ग्रामपंचायतीत प्रशासक कार्यरत आहे अशा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचे वितरण केले जाणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

तालुकानिहाय निधी

अकोले (99 ग्रामपंचायती) 2 कोटी 7 लाख 86 हजार रुपये, संगमनेर (142) 4 कोटी 77 लाख 38 हजार, कोपरगाव(75) 2 कोटी 71 लाख 76 हजार, राहाता (50) 3 कोटी 5 लाख श्रीरामपूर (52) 2 कोटी 31 लाख 27 हजार, राहुरी (83) 2 कोटी 95 लाख 21 हजार, नेवासा (114) 3 कोटी 93 लाख 79 हजार, शेवगाव (94) 2 कोटी 41 लाख 91 हजार, पाथर्डी (107) 2 कोटी 69 लाख 40 हजार, जामखेड (58) 1 कोटी 38 लाख 64 हजार, कर्जत (91) 2 कोटी53 लाख 93 हजार, श्रीगोंदा (86) 3 कोटी32 लाख, 34 हजार, पारनेर (114) 3 कोटी 4 लाख 58 हजार, अहमदनगर (102) 3 कोटी 26 लाख 9 हजार रूपये असा एकूण 40 कोटी 50 लाख 2 हजार रुपये.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com