दोन एकरात 100 दिवसात 32 क्विंटल हरभरा उत्पादन

दोन एकरात 100 दिवसात 32 क्विंटल हरभरा उत्पादन

सात्रळ |वार्ताहर| Satral

एकीकडे अर्थकारणामुळे व निसर्गाचा लहरीपणा आणि महागाईच्या आगडोंबामुळे शेती करणे अत्यंत कठीण झाले असतानाच राहुरी तालुक्यातील रामपूर येथील प्रगतशील शेतकरी तुषार रावसाहेब तनपुरे यांनी दोन एकरात 100 दिवसात हरभर्‍याचे 32 क्विंटल विक्रमी उत्पादन मिळविले. त्यांना सहाय्यक कृषी अधिकारी तानाजी शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, तनपुरे यांचे वडील रावसाहेब तनपुरे, आई लता तनपुरे व पत्नी पल्लवी तनपुरे यांनीही श्रमदान करून काळ्या मातीत मोत्यांची उगवण केली. या शेतकर्‍याच्या यशोगाथेचे परिसरातील शेतकर्‍यांनी कौतूक केले आहे.

तनपुरे यांच्या गट क्रमांक 314/2/2/ब/1 मध्ये 0.80 हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाचे बियाणे अडीच फूट सरी काढून 15 सेंटिमीटर अंतरावर बियाणाची टोकण पद्धतीने लागवड केली. बियाणे टोकण करण्यापूर्वी बियाणास ट्रायकोडर्मा व पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केली. दोन एकर क्षेत्रासाठी 40 किलो बियाणे वापरण्यात आले. ही लागवड 12 नोव्हेंबर 2019 ला करून काढणी 25 मार्च 2020 ला म्हणजे बरोबर 100 दिवसात काढणी केली व 32 क्विंटल उत्पादन मिळाले. शेतात मेहनत करून आधुनिक तंत्रज्ञानाची मदत आणि कृषी अधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेतल्यास मातीत सोने उगवते, अशी अनुभूती तनपुरे यांना आली.

Related Stories

No stories found.