Gram Panchayat Election Result : इंदोरीकर महाराजांच्या सासुबाई बनल्या सरपंच, कोणत्या पक्षाकडून मिळवला विजय?

इंदोरीकर महाराज
इंदोरीकर महाराज

संगमनेर | Sangamner

राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक नेत्यांनी आपले गड राखले आहे तर अनेकांच्या गडाला सुरूंग लागला आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्ती ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामुळं चर्चेत आल्या आहेत.

अशातच, संगमनेर (Sangamner) तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या लढतीत शशिकला शिवाजी पवार विजयी झाल्या आहेत. शशिकला शिवाजी पवार या किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई आहेत.

इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. अपक्ष उमेदवारी दाखल करत इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. शशिकला पवार यांनी सुशीला उत्तम पवार यांचा पराभव केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com