Rahata Gram Panchayat Election Result : राहाता तालुक्यातील ग्रामपंचायतींवर विखे पाटलांचे वर्चस्व

आ. राधाकृष्ण विखे पाटील
आ. राधाकृष्ण विखे पाटील

राहाता | तालुका प्रतिनिधी

तालुक्‍यातील १२ ग्रामपंचायतींच्‍या झालेल्‍या निवडणूकीत सरपंच पदासह सर्व जागांवर महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली जनसेवा मंडळाला निर्विवाद यश मिळाले आहे. लोहगाव ग्रामपंचायतीमध्‍ये यापुर्वीच सर्व सदस्‍य आणि सरपंच बिनविरोध निवडून आल्‍याने तालुक्‍यात झालेल्‍या बाराही गावांमध्‍ये भारतीय जनता पक्षला मोठा विजय मिळाला आहे.

ग्रामपंचायत निवडणूकी करीता घेण्‍यात आलेल्‍या मतदानाची मतमोजणी संपन्‍न यामध्‍ये तालुक्‍यातील अकराही गावांमध्‍ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्‍व सिध्‍द झाले आहे. डो-हाळे ग्रामपंचायतीमध्‍ये विखे पाटील गटाच्‍या सौ.सारीका नवनाथ अंबेडकर या १ हजार ८४ मतं घेवून विजय झाल्‍या आहेत. या गावामध्‍ये विखे पाटील गटाला ६ जागांवर विजय मिळाला असून, या मध्‍ये सुनिल आबासाहेब जपे, गोपीनाथ नानासाहेब डांबे, वैभव रामनाथ डांगे, संगिता बाबासाहेब सरोदे, आश्‍वीनी कृष्‍णा डांगे या तर विखे पाटील यांना मानणा-याच दुस-या गटातील सतिष पाराजी गव्‍हाणे, भारती सोमनाथ लांडगे, सुरेखा आप्‍पासाहेब लांडगे हे सदस्‍य विजयी झाले आहे.

आ. राधाकृष्ण विखे पाटील
Gram Panchayat Election Result : इंदोरीकर महाराजांच्या सासुबाई बनल्या सरपंच, कोणत्या पक्षाकडून मिळवला विजय?

नांदुर्खी बुद्रूक ग्रामपंचायतीमध्‍ये जनसेवा ग्रामविकास मंडळाचे माधव बाबुराव चौधरी हे सरपंच पदाकरीता निवडून आले आहेत. याच गटाचे उमेदवार सचिन लक्ष्‍मण कोळगे, अमोल भगवान चौधरी, अलका आप्‍पासाहेब दाभाडे, विरेश तुकाराम चौधरी, सौ.शशीकला लक्ष्‍मण भराटे, सौ.छाया रामनाथ वाकचौरे हे सदस्‍य विजयी झाले आहेत. तर उर्वरित जागांवर झोटींगबाबा ग्रामविकास मंडळाचे अरुण साहेबराव चौधरी, अलका ज्ञानदेव चौधरी, छाया रामनाथ चौधरी, रुषभ मुकूंद चौधरी आणि अनिता अमोल कोळगे हे सदस्‍य विजयी झाले आहे.

नांदूर्खी खुर्द गावामध्‍ये विखे पाटील गटाच्‍या सौ.आशा संजय आरणे या सरपंच पदावर विजयी झाल्‍या असून, याच गटाचे सुनिल दौलत वाणी, सौ.रुपाली स्‍वप्‍नील दाभाडे, मनिषा कचेश्‍वर वाणी, सचिन आण्‍णासाहेब दाभाडे, सौ.सुचिता जनार्दन वाणी, श्री.विजयकुमार आंबादास वाणी, सौ.कमलाबाई विजय वाणी हे सदस्‍य पदावर निवडून आले आहेत.

आ. राधाकृष्ण विखे पाटील
Gram Panchayat Election Result : काष्टीत आ.पाचपुतेंना मोठा धक्का!

खडकेवाके गावामध्‍ये सत्‍ताधारी गटाच्‍या जनसेवा मंडळाला सर्वच जागांवर विजय मिळाला असून, सरपंच पदावर संगिता सचिन मुरादे या विजयी झाल्‍या आहेत. सदस्‍यपदावर जालिंदर गंगाधर मुरादे, जयश्री राजेंद्र मुरादे, कविता सुदाम लावरे, सोमनाथ भाऊसाहेब मुजमुले, हिराबाई राजेंद्र मुरादे, मनिषा प्रकाश लावरे, दिपक तान्‍हाजी गायकवाड, बाळासाहेब भिमराज लावरे, आश्‍वीनी रविंद्र सुरासे हे विजयी झाले आहेत.

आडगांव खुर्द गावामध्‍ये सरपंच पदावर अनिल सुभाष बर्डे हे विजयी झाले असून, सदस्‍य पदासाठी प्रकाश मोहणराज शेळके, अलका चांगदेव शेळके, सुनिता विजय काळे, नवनाथ मच्छिंद्र माळी, दिनकर माधव कडलग, निषा विजय गायकवाड हे सदस्‍यपदी निवडून आले आहेत.

नपावाडी गावामध्‍ये सरपंच पदाकारीता पल्‍लवी राजेंद्र इल्‍हे या विजयी झाल्‍या आहेत. तर सदस्‍य पदाकारीता विलास रामनाथ धनवटे, धनंजय विलास उगले, वैशाली राजेंद्र धनवटे हे विखे पाटील व काळे गटाचे उमेदवार विजयी झाले असून, कोल्‍हे गटाचे दिपक भाऊसाहेब वहाडणे, उज्‍वला सुभाष वहाडणे, सुनिता भागवत उगले, विशाल पंडित धनवटे, अलका एकनाथ सांळूखे, कल्‍पना विक्रम वहाडणे हे विजयी झाले आहेत.

निघोज ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदासाठी सौ.शोभा नवनाथ मोरे ह्या विजयी झाल्‍या असून, सदस्य पदाकरीता फ्रान्‍सीस दामु जगताप, भानुदार बबन गाडेकर, संदिप भास्‍कर मते, निकीता राजेंद्र जगताप, शितल नानासाहेब गव्‍हाणे, बाळासाहेब सिताराम मते, सौ.संगिता भारत मते, सौ.प्रतिभा आप्‍पासाहेब चव्‍हाण, प्रसाद गंगाधर मते, सौ.पायल रविंद्र रोकडे, सौ.सुनिता विलास मते हे विजयी झाले आहेत.

आ. राधाकृष्ण विखे पाटील
विवाहितेचा मृतदेह हौदामध्ये आढळल्याने खळबळ, पतीसह सासू पोलिसांच्या ताब्यात.. कुठे घडली घटना?

रांजणखोल ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदासाठी सौ.शुभांगी बाबासाहेब ढोकचौळे या विजयी झाल्‍या असून, सदस्‍य पदाकारीता भाऊसाहेब माधवराव ढोंकरे, रमेश रावसाहेब ढोकचौळे, सौ.संगिता राजू गायकवाड, जयश्री कैलास ढोकचौळे, संदिप सिताराम अंभग, चांगदेव आंबादास ढोकचौळे, शकिल नवाब पठाण, सविता सिध्‍दार्थ बागुल, सौ.परवीन जाकीर शेख, सौ.सुलाबी अब्‍दुल पांडे हे विजयी झाले आहेत. सौ.गंगुबाई लांडगे, सागर शिवाजी ढोकचौळे, कल्‍पना दिलीप यादव हे यापुर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.

सावळीविहीर बुद्रूक ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदासाठी ओमेश साहेबराव जपे हे विजयी झाले असून, सदस्‍यपदासाठी यापुर्वीच दत्‍तात्रय जिजाबा आगलावे, दिलीप मंजाहरी गायकवाड, गणेश एकनाथ आगलावे, शैला महेंद्र पवार, माया महेश जपे, आशीष कैलास आगलावे हे बिनविरोध निवडून आले होते. मतदानानंतर सुजाता अमोल भोसले, मिना छबु बनसोडे, सागर राजेंद्र आरणे, रुपाली संजय जपे, विकास नानासाहेब जपे, सुवर्ण प्रदिप नितनवरे, केशरबाई गणपत सदाफळ, संतोष विश्‍वनाथ कसबे आणि सौ.आशा पुनम कोठारी हे विजयी झाले आहेत.

तालुक्‍याचे लक्ष लागुन राहीलेल्‍या साकुरी ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदावर सौ.मेघना संदिप दंडवते या विजयी झाल्‍या असून, सदस्‍य पदाकरीता बाबासाहेब भाऊसाहेब शिंदे, सविता शिवाजी नजन, सौ.रुपाली बाबासाहेब रोहोम, रावासाहेब आनंदा बनसोडे, नंदा गणेश माळी, गौरव भारत उपाध्‍ये, करुणा भारत बनसोडे, निकिता अक्षय रोहोम, विश्‍वनाथ प्रकाश बनसोडे, स‍चिन जोसेफ बनसोडे, कल्‍याणी राहुल बनसोडे, दिलीप नारायण बनसोडे, पुंडलीक नानासाहेब बावके, सिंधू नारायण देवकर हे विजयी झाले आहेत.

राजूरी ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदावर सौ.संगिता जालिंदर पठारे या विजयी झाल्‍या असून, सदस्‍य पदासाठी नितीन चांगदेव गाडेकर, सोमनाथ बाळासाहेब गोरे, सुरेखा उमेश कदम, अनिता किशोर दळे, सोमनाथ नानासाहेब कदम, भगवान बाळासाहेब गोरे, हौशीराम अशोक जाधव, सपना मधुकर गोरे, सोनाली शिवनाथ गोरे, रिजवान शौकत पठाण, स्‍वाती तुषार लाळगे हे सदस्‍य पदासाठी विजयी झाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com