Gram Panchayat Election Result : चांदेकसारेत कोल्हे गटाला धक्का तर डाऊच खुर्दला गुरसळ यांनी मारली बाजी

काळे गटाचे किरण होन विजयी
Gram Panchayat Election Result : चांदेकसारेत कोल्हे गटाला धक्का तर डाऊच खुर्दला गुरसळ यांनी मारली बाजी

सोनेवाडी (वार्ताहर)

कोपरगाव तालुक्यात प्रतिष्ठेची असलेली चांदेकसारे ग्रामपंचायतीची कोल्हे गटाकडे असलेली सत्ता काळे गटाने मोडीत काढत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

काळे गटाकडून किरण विश्वनाथ होऊन हे 169 मताने विजयी झाले. काळे गटाबरोबर परजणे व शिवसेना यांनी निवडणुकीपूर्वी युती केली होती. त्याचा फायदा काळे गटाला झाला. तर कोल्हे गटाने वार्ड नंबर दोन मधील सदस्य पदाचे दोन उमेदवार निवडून आले. आमदार आशुतोष काळे व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठित केली होती.

दोन अपक्ष उमेदवारांनी देखील या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांना फारशी मते मिळाली नाही. निवडणुकीचा निकाल बाहेर येताच चांदेकसारे ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाच्या बाहेर गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.

चौरंगी लढतीत डाऊच खुर्दला शिवसेनेचे गुरसळ यांनी बाजी मारली

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायती मध्ये चौरंगी लढत झाल्याने या ग्रामपंचायतीचा निकाल कोणत्या बाजूने लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते मात्र शिवसेनेचे संजय गुरसळ यांनी सर्वांना धक्का देत पुन्हा एकदा सरपंच पदावर आपले वर्चस्व सिद्ध करत पत्नी स्नेहा संजय गुरसळ यांना विजयी केले.

कोल्हे काळे परजणे आणि शिवसेना अशी चौरंगी लढत डाऊच खुर्द मध्ये होती. मतदारांना अनेक प्रकारचे आमिषे दाखवून आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र शिवसेनेच्या संजय गुरसळ यांनी सर्वांना मात देत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com