सुपा (वार्ताहर) -

ग्रांमपचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरुन झाले. आता निवडणुकीतील गर्दी कमी करण्यासाठी राजकीय डावपेचांना सुरूवात झाली आहे. यामुळे

कोण-कोण इच्छुक माघार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान निवडणुकीतून माघार घेण्यासाठी नेत्यांकडून साम, दाम आणि दंडाचा वापर सुरू झाल्याची चर्चा सुपा गावात सुरू झाली आहे.

ग्रांमपचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरून झाले. दाखल अर्जाची पडताळणी झाली असून आता इच्छुक उमेदवारांना आपल्या विरूध्द गटातील कोण कोण माघार घेणार याचे वेध लागले आहेत. उद्या सोमवार (दि 4) अर्ज माघारीचा शेवटची दिवस आहे. आपल्या विरोधातील जास्तीतजास्त उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी राजकीय डाव पेचाना सुरूवात झाली आहे. यासाठी साम, दाम, दंडाचा ही वापर करण्यात येत आहे.

गावची निवडणूक असल्याने भाऊबदकी, नातेवाईक याचा वापर करून दबाव तंत्र वापरून जास्तीत जास्त अर्जाचे आडथळे काढुन आपल्या पॅनलचा विजयाचा कसा मार्ग सुखकर होईल, यासाठी धडपड सुरू आहे. हा उपाय करून उपयोग न नाही झाल्यास शेवटी ‘अर्थ’पूर्ण तडजोडी व वेगवेगळी आश्वासन दिले जात आहेत.

निवडणुकीचे चित्र सोमवारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हे वाटप होईल व त्यानंतर प्रचाराचा धुराळा उडणार आहे. उमेदवारांना प्रचारासाठी फक्त दहा दिवसाचा कालावधी आहे. मात्र, त्या आधी निवडणुकीतील जास्ती जास्त स्पर्धक यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.