<p>राहुरी | Rahuri</p><p>ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज शेवटचा दिवस होता. रात्री उशिरापर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. राहुरी तहसील कार्यालयात उमेदवारांची तोबा गर्दी झाली होती.</p>.<p>राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणूकी करिता एकूण ९५ हजार मतदार संख्या असून ४९ हजार ४९७ पुरुष मतदार, तर ४४ हजार ७१० महिला मतदार आहेत. एकूण १६७ मतदान केंद्र असून १५० प्रभागातून ४१८ ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक प्रशासनाने आठ झोन तयार केली असून, जवळपास १ हजार अधिकारी, कर्मचारी, सहाय्यक, यांच्या नेमणुका केलेल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १५० प्रभागातून ग्रामपंचायतीच्या ४१८ जागेसाठी एकूण १ हजार ४०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.</p>