ग्रामपंचायत निवडणुक : अकोलेत 15 अर्ज अवैध

ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

अकोले (प्रतिनिधी) -

अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या असून दि.23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत 1147 उमेदवारी अर्ज

प्राप्त झाले होते. दि. 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होती, त्या छाननी मध्ये 1132 उमेदवारी अर्ज वैध ठरले असून 15 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये लिंगदेव, चैतन्यपूर, टाकळी, ब्राह्मणवाडा, बेलापूर, रुंभोडी, पिंपळदरी, मन्याळे, धामणगाव पाट व देवठाण या गावांच्या उमेदवारी अर्जापैकी काही अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे.

त्यामध्ये लिंगदेव ग्रामपंचायत 33 उमेदवारी अर्जांपैकी 3 उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. चैतन्यपूर येथे 6 उमेदवारी अर्जापैकी 1 अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. टाकळी येथील 28 उमेदवारी अर्जापैकी 1 अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. ब्राह्मणवाडा येथील 35 उमेदवारी अर्जापैकी 1 अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. बेलापूर येथील 28 उमेदवारी अर्जापैकी 1 अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. रुंभोडी येथील 32 उमेदवारी अर्जापैकी 2 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. पिंपळदरी येथील 26 उमेदवारी अर्जापैकी 1 अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. तांभोळ येथील 16 उमेदवारी अर्जापैकी 1 अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. मन्याळे येथील 15 उमेदवारी अर्जापैकी 1 अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. धामणगाव पाट येथील 17 उमेदवारी अर्जापैकी 1 अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. तर देवठाण येथील 68 उमेदवारी अर्जापैकी 2 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. 1147 उमेदवारी अर्जापैकी 15 अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने आता निवडणुकीसाठी 1132 अर्ज राहिले असून आता दि. 4 जानेवारी रोजी माघारीच्या दिवशी किती ग्रामपंचायती बिनविरोध होतात व किती ग्रामपंचायतीच्या निवडणूका होतात हे समजणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com