चिमुकल्यांचा स्तुत्य उपक्रम! शाळेत पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची व्यवस्था

उन्हाळ्यात पक्ष्यांना दिलासा
चिमुकल्यांचा स्तुत्य उपक्रम! शाळेत पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची व्यवस्था

तळेगाव दिघे | वार्ताहर

हवामान विभागाने (IMD) वर्तवलेला अंदाज १०० टक्के खरा होत असून मार्च अखेरीस नगर जिल्ह्याचे तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाले आहे. एक प्रकारे उष्णतेची लाट (Heat Wave) आली असून रखरखीत उन्हात (Summer) पशु-पक्षांना अन्न पाणी मिळणे अवघड झाले आहे.

चिमुकल्यांचा स्तुत्य उपक्रम! शाळेत पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची व्यवस्था
Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला 'प्रार्थना'चा मोहक लूक, पहा फोटो

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता संगमनेर (Sangamner) तालुक्यातील पारेगाव बुद्रुक (Paregoan Budruk) येथील जिल्हा परिषदेच्या गोर्डेमळा प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना आवाहन करताच, विद्यार्थ्यांनी शाळेत जुन्या प्लास्टिक डब्यांपासून पक्षी पाणवठा, धान्य ठेवण्यासाठी बर्ड फिडर तयार केले. पक्ष्यांसाठी केली धान्य आणि पाण्याची व्यवस्था केली आहे.

गोर्डे मळा प्राथमिक शाळेतील (Elementary school) चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी थोडी बाजरी, ज्वारी, बारीक गहू, तांदूळ कण्या आदी धान्य आणतात. शेकडो वृक्षवेलीनी समृद्ध असलेल्या शाळेत धान्य खाण्यासाठी अनेक पक्षी येत आहेत. चिमण्या, कावळे, पोपट, साळूंकी, मैना आदी पक्ष्यांचा दरवळ वाढला असून शालेय परिसर त्यांचे हक्काचे घर झाले आहे.

चिमुकल्यांचा स्तुत्य उपक्रम! शाळेत पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची व्यवस्था
Amruta Khanvilkar : 'अप्सरा हो तुम, या कोई परी'! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

मूलं आपल्या घरीही पक्षांसाठी स्वतः तयार केलेल्या टाकाऊ भांड्यात अन्नधान्य, पाणी ठेवत पक्षीप्रेमाचे धडे गिरवत आहे. निसर्ग साखळीत पशू-पक्षी खूप महत्त्वाचे आहेत. जंगल तोडीमुळे पक्षांना अन्न-पाणी मिळणे कठीण झाले आहे. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक साहेबराव गायकवाड, सुखदेव इल्हे, लक्ष्मण सुर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले. गोर्डेमळा शाळेने पक्ष्यासाठी राबविलेला स्तुत्य उपक्रम इतर शाळांनी राबवावा असे, अवाहन केंद्रप्रमुख यशवंत आंबेडकर यांनी केले आहे.

चिमुकल्यांचा स्तुत्य उपक्रम! शाळेत पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची व्यवस्था
अनिल अंबानींनी 'या' दोन मोठ्या कंपन्यांचे संचालकपद सोडले... काय आहे कारण?

Related Stories

No stories found.