पदवीधारक पशुवैद्यकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पशुवैद्यकांचे आ. विखे यांना साकडे

पदवीधारक पशुवैद्यकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पशुवैद्यकांचे आ. विखे यांना साकडे

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

पदवीधारक पशुवैद्यकांचे (Graduate Veterinarian) विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवावेत यासाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrushan Vikhe Patil) यांच्याकडे पदवीधारक पशुवैद्यकांनी साकडे घातले आहे.

पशुसंवर्धन विभागामध्ये (Department of Animal Husbandry) राज्यात पशुवैद्यकांचे प्रलंबित मागण्या प्रकरणी 15 जूनपासून विविध प्रकारची आंदोलने (Movement) चालू आहेत. या निमित्ताने पशुचिकीत्सा व्यवसाय संघटनेच्या शिष्टमंडळाने आ. राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

या निवेदनात या संघटनेने विविध मागण्या केल्या आहेत. पशुधन विकास अधिकारी गट अ सेवा प्रवेश नियमात सरळ सेवेने 85 टक्के पदोन्नत प. वि. अ. गट 15 टक्के, पदवीधर पशुवैद्यक 5 टक्के पदोन्नतीने अशी तरतूद असावी. प. वि. अ. (विस्तार) गट पंचायत समिती या पदनामात बदल करुन तालुका पशुसंवर्धन अधिकारी गट अ पंचायत समिती रद्द करणे. पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी, प. वि. अ. गट ब संवर्गातील कर्मचार्‍यांना देण्यात सहायक आयुक्त सेवाप्रवेश नियम मधील तरतुदीप्रमाणे वेतनस्तर एस 22 सुधारित आदेश (Modified order) होणेबाबत.

ग्रामसेवक व कृषीसहायक यांच्या धर्तीवर संवर्गातील कर्मचार्‍यांना दरमहा वेनतातुन कायम प्रवास भत्ता मंजुर करणे, यासह 11 मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी जिल्हा सचिव डॉ. नितीन निर्मळ म्हणाले, पशुसंवर्धन विभागाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने संघटनेने 15 जून पासुन टप्प्याटप्याने आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर करून आंदोलन सुरू केले आहे. यापुढील काळात 15 जुलै 2021 पासून कायद्याप्रमाणे काम बंद आंदोलनामुळे ग्रामीण पशुवैद्यकिय सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम दूध व्यवसाय व पशुवैद्यकिय सेवेवर होणार आहे. परिणामी राज्यात शेतकर्‍यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

आ. विखे पाटील यांना संघटनेने निवेदन दिले. त्यावर आ. विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबतचे पत्र देऊन संबंधीत खात्याचे मंत्री, सचिव यांची लवकरच बैठक आयोजित करणेबाबत पाठपुरावा व प्रश्न सोडविण्यासाठी लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना दिले.

याप्रसंगी पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेचे सचिव डॉ. नितीन निर्मळ, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. उमेश पंडूरे, राहाता तालुकाध्यक्ष डॉ. दिलीप डांगे, डॉ. दिलीप शेरकर, डॉ. देवराम जरे, डॉ. संदीप निधाने आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com