पदवीधरसाठी 9 समन्वय अधिकार्‍यांची नियुक्ती

बैठकीत जिल्हाधिकार्‍यांकडून मार्गदर्शन
पदवीधरसाठी 9 समन्वय अधिकार्‍यांची नियुक्ती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हास्तरावर विषयनिहाय नऊ समन्वय अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकारी यांनी या अधिकारी-कर्मचारी यांची प्रदीर्घ बैठक घेत निवडणूक प्रक्रिया व आदर्श आचारसंहितेबाबत कायदेविषयक तरतुदींविषयी सखोल मार्गदर्शन केले.

अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, महसूल शाखा उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ यांच्यासह सर्व समन्वय अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची वर्षाअखेरीस घोषणा केली. येत्या 30 जानेवारी रोजी मतदान तर 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. नाशिक महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे निवडणूक निर्णय अधिकारी असून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. या निवडणुकीचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हास्तरावर विषयनिहाय कक्ष स्थापन केले आहेत.

या कक्षाचे कामकाज सुरळीतपणे होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी कक्ष निहाय समन्वय अधिकार्‍यांची नियुक्ती केली. त्यासाठी त्यांना सहाय्यक अधिकारी व कर्मचारी देखील देण्यात आले आहेत. आचारसंहिता कक्षाचे समन्वय अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील असणार आहेत. त्यांना सहाय्यक म्हणून शाखेचे नायब तहसीलदार राजू दिवाण व सहाय्यक कर्मचारी देण्यात आले आहेत. मतदार मदत कक्षाची जबाबदारी भूसंपादन उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांना सहाय्यक म्हणून दोन मंडल अधिकारी आणि एक महसूल सहाय्यक देण्यात आले आहेत.

टपाली मतपत्रिका कक्षाचे काम भूसंपादन अधिकारी बालाजी क्षीरसागर व महसूल शाखेच्या तहसीलदार माधुरी आंधळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. वाहतूक व्यवस्थेचे काम भूसंपादन अधिकारी उज्वला गाडेकर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांना सोपविण्यात आले आहे. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर यांच्याकडे प्रसार माध्यम कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. कर्मचारी व्यवस्थापन कक्षाची जबाबदारी जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकास्कर यांच्याकडे असून सामान्य प्रशासन शाखेच्या तहसीलदार वैशाली आव्हाड या सहाय्यक आहेत.

साहित्य प्राप्त करून घेणे व वाटप सुकृती करणे या कक्षाचे काम जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांच्याकडे देण्यात आले आहे. या कामी पुरवठा शाखेचे नायब तहसीलदार अभिजीत वांढेकर, दत्तात्रय भावले यांच्यासह चार कर्मचारी त्यांच्या मदतनीस राहणार आहेत. प्रशिक्षण कक्षाची धुरा जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी तीन कर्मचारी देण्यात आले आहेत. वेतनपट तयार करणे व अनुषंगिक कामकाजासाठी लेखाधिकारी खेडकर, लेखाधिकारी गायमुक्ते, उपलेखापाल वडणे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com