पद्वीधरसाठी अवघे तीन अपक्षांचे अर्ज दाखल

अखेरचे दोन दिवस बाकी || 30 जानेवारीला मतदान
पद्वीधरसाठी अवघे तीन अपक्षांचे अर्ज दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवार (दि.10) रोजी चौथ्या दिवशी तीन अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्जापैकी दोन अर्ज धुळे, तर नाशिक जिल्ह्यातील असून हे सर्व अर्ज अपक्ष असल्याची माहिती नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी दिली.

दरम्यान, आता उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी असून गुरूवार (दि.12) शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीसाठी विद्यमान काँग्रेस आणि विरोधी भाजपकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आज (बुधवारी) किंवा उद्या गुरूवारी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांच्या घोषणेचे गुर्‍हाळ सुरू राहणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपकडून ऐनवळी अनपेक्षीत उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातून राजकीय उत्स्कूता ताणली गली आहे. मंगळवारी दाखल अर्जात शुभांगी भास्कर पाटील, धुळे, अ‍ॅड. जुबेर नसीर शेख, धुळे व सोमनाथ नाना गायकवाड, नाशिक या तिन्ही उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. उमदेवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर 16 जानेवारीला अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे.

या निवडणुकीसाठी 1 ऑक्टोबरपासून मतदान नोंदणी कार्यक्रम सुरु झाला होता. आजअखेर 1 लाख 16 हजार मतदार नोंदणी झाली आहे. गेल्या 2017 च्या निवडणुकीत 85 हजार 286 अर्ज दाखल झाले होते. त्या तुलनेत यंदा नवमतदार वाढले असून नाशिक विभागात नगर जिल्हा अव्वल असल्याचे आकडेवारीमध्ये दिसत आहे. या निवडणुकीत उमेदवारांसाठी अनामत रक्कम अनुसूचित जाती जमातीसाठी 5 हजार व इतर प्रवर्गासाठी 10 रुपये हजार ठेवण्यात आलेली आहे. 30 जानेवारी 2023 ला मतदान होणार असून 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com