राज्यपाल यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

नगर शहर शिवसेनेच्यावतीने निदर्शने करून सह्यांची मोहीम
राज्यपाल यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रामधील जनतेबद्दल जे चुकीचे वक्तव्य केले त्याचा पूर्ण राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. नगरमध्ये शहर शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे रविवारी भर पावसात आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसोंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, नगरसेवक योगीराज गाडे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच नागरिकांसाठी सह्यांची मोहीम सुद्धा राबविण्यात आली. यावेळी बोलताना शहरप्रमुख कदम म्हणाले, ‘राज्यपाल हे पद अति महत्वाचे आहे. परंतु त्या पदावर बसलेली व्यक्ती ही कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आली आहे. तेव्हा आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की, त्यांना तुम्ही दिल्लीला बोलावून घ्यावे. आज फक्त शिवसेनाच नाही तर राज्यातील प्रत्येक नागरिक त्या वक्तव्याचा निषेध करतो आहे’, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com