शासनाने पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन भरपाई द्यावी

शासनाने पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन भरपाई द्यावी

बेलापूर |वार्ताहर| Belapur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rain) शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान (Farmers Loss) झाले असुन गेल्या आठ दिवसापासून परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे सर्व पिके सडली (Crops Rotted) आहेत. नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे (Immediate Panchnama) करुन शेतकर्‍यांंना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते सुधाकर खंडागळे (Sudhakar Khandagale) यांनी केला आहे.

शेतकर्‍यांना नुकसान भरपाईसाठी (Compensation to Farmers) 24 तासात 65 मीली मिटर पावसाची असणारी अट शिथील करावी. शेतकरी सतत कशाचे ना कशाचे बळी ठरत असतात. कधी भावाचे, कधी निसर्गाचे. भावाचा घाव शेतकरी सहनही करु शकेल, परंतू निसर्गाचा मार सहन करण्याची ताकद आज शेतकरी वर्गात राहीली नाही. आगोदरच तुटपुंजी शेती त्यात त्यावर होणारा खर्च अन त्यातून मिळणारे उत्पन्न याचा मेळ घालताना तो मेटाकुटीस आला असतानाच निसर्गाचाही मोठा फटका सहन करावा लागत आहे. असे खंडागळे म्हणाले

यावेळेस कसेतरी पिक (Crops) आले आहे. दसरा, दिपावलीचे स्वप्न पहात असतानाच नुकत्याच झालेल्या पावसाने त्यांच्या स्वप्नाची धुळधाण झाली. सोयाबिन (Soybean), कपाशी (Cotton), मका (Corn), घास, फळबागा (Orchards) पाण्यात पोहत आहेत. आता दाद कुणाकडे मागायची? शेतकर्‍यांच्या मदतीला सरकार धावून येईल का? गेल्या आठ दिवसापासून परतीच्या पावसामुळे सर्व पिके सडली आहेत. नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खंडागळे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.