सरकारी शाळांत शिक्षकांची 31 हजार पदे रिक्त; महानगरपालिका कार्यक्षेत्र 60 टक्के पदे रिक्त

सरकारी शाळांत शिक्षकांची 31 हजार पदे रिक्त; महानगरपालिका कार्यक्षेत्र 60 टक्के पदे रिक्त

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये 31 हजाराहून अधिक पदे रिक्त असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आले आहे. केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या अहवालात राज्यात 18 हजारापर्यंत जागा असल्याचे सूचित करण्यात आले होते.

शिक्षणहक्क कायद्यानुसार शाळांमध्ये शिक्षकांची दहा टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त असू नयेत, असा नियम असतानाही राज्यातील सरकारी शाळांमध्ये 31 हजार 472 पदे रिक्त आहेत. हे शेकडा प्रमाण 13 टक्के आहे. शाळांकडे शिक्षक संख्या कमी असताना शासनाचे वेगवेगळे विभाग मात्र शिक्षकांना वेगळे कामासाठी धाडत असल्याने शिक्षणाचे गुणवत्ता उंचावणार कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गुरुजी बस स्टॉपवर स्वागताला

करोनाच्या कालावधीत राज्यातील प्राथमिक शिक्षकांना वेगवेगळ्या विभागाच्या वतीने मदतीसाठी आदेशीत करण्यात आले होते. तोच कित्ता पुन्हा राज्यातील वेगळे विभाग गिरवू लागले आहेत. शाळा सुरू झालेल्या आहे. शिक्षक संख्या कमी आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कृषी, परिवहन, महसूल हे विभाग शिक्षकांना आपलेच कर्मचारी समजून आदेश देऊ लागले आहे.

काही ठिकाणी शिक्षकांना ई-पीक पाहणी करणे, वाहतूक नियोजन करणे, चहापान व्यवस्था आदी कामे करण्याचा झाला आहे. आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे कधी, असा प्रश्न निर्माण होतो आहे. कोकणामध्ये मुंबईतून येणारे प्रवासी यांची गर्दी वाढली असल्याने राजापूर तालुक्याने शिक्षकांना बसस्थानकावरती प्रवाशांचे स्वागत करणे व मदत साठी नियुक्त केले आहे. जळगाव जिल्ह्यातील एका तालुक्याने शिक्षकांना ई पिक पाहणी जनजागृती करण्याचे आदेश दिले आहे.

अशी आहेत पदे रिक्त

राज्यातील जिल्हा परिषद महापालिका, नगरपरिषद, कटक मंडळांच्या शाळांमध्ये एकूण दोन लाख 45 हजार 591 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी दोन लाख 14 हजार 119 पदांवर शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे 31 हजार 472 शिक्षकांची पदे रिक्त आहे. प्राथमिक शिक्षणाची पदे रिक्त आहे पण त्याचबरोबर, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी, उपसंचालक, सहसंचालक आणि संचालक यांची पदे देखील रिक्त आहेत. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात ‘प्रभारी राज’ सुरू आहे. या सगळ्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com