वसतिगृहांसाठी लागू केलेली डीबीटी योजना सरकारने तात्काळ बंद करावी
File Photo

वसतिगृहांसाठी लागू केलेली डीबीटी योजना सरकारने तात्काळ बंद करावी

आदिवासी बचाव कृती समितीची मागणी

अकोले |प्रतिनिधी| Akole

तत्कालीन फडणवीस सरकारने (Fadnavis government) आदिवासी वसतिगृहांसाठी (Tribal hostels) लागू केलेली डीबीटी योजना (DBT plan) सरकारने तात्काळ बंद करावी, अशी मागणी (Demand) आदिवासी वसतिगृह बचाव कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बैठकीत (Online Meeting) करण्यात आली.

ट्रायबल फोरमचे (Tribal Forum) विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डीबीटी योजना (DBT plan) संदर्भात चर्चा करण्यासाठी विद्यार्थी शिष्टमंडळास आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी (Tribal Development Minister Adv. K. C. Padvi) यांचेकडे विद्यार्थी कृती समितीचे समन्वयक मदन पथवे यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

डीबीटी योजनेचा अभ्यास करण्यासाठी सरकारने माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी ऑगस्ट 2020 मध्ये स्थापन केली होती. ही कमिटी तीन महिन्यांत सरकारला अहवाल सादर करणार होती. आता पुढील महिन्यात कमिटीला एक वर्ष पूर्ण होईल तरी अजून अहवाल सादर न झाल्याने डीबीटी योजनेबाबत सरकार निर्णय घेत नाही. म्हणून विद्यार्थी व पालक वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे असे आजच्या बैठकीत समोर आले.

आदिवासी वसतिगृहांसाठी लागू केलेली डीबीटी योजना जर सरकारने बंद केली नाही तर विभागीय बैठकांच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थी आंदोलनाची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने पुन्हा आदिवासी विद्यार्थ्यांना पुणे ते नाशिक आदिवासी विद्यार्थी पायी शिक्षण संघर्ष मोर्च्याची पुनरावृत्ती करण्यास भाग पाडू नये असे मत व्यक्त करण्यात आले.

आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी (Tribal Development Minister Adv. K. C. Padvi) लवकरच विद्यार्थ्यां शिष्टमंडळास चर्चेस बोलावतील असा विश्वास मदन पथवे यांनी व्यक्त केला आहे. या बैठकीत जो काही निर्णय होईल त्यानुसार पुढील रणनीती ठरविण्यात येईल. यावेळी एकनाथ भोये, सतिश दादा भांगरे, लकी जाधव, कैलास वसावे, रोशन गावित, प्रशील पड्को, शरद पोटकुले, सुनील उंडे आदींसह अनेक विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com