आ. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांना रोखल्याने चौंडीत तणाव

आ. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांना रोखल्याने चौंडीत तणाव

जामखेड | प्रतिनिधी

अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी होत असलेल्या जयंती सोहळ्यासाठी जात असताना आ. गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांना सीमेवरच रोखल्याने पोलीस व पडळकर यांच्यात बाचबाची झाली. धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झल्यामे चौंडीत मोठा तणाव निर्माण झाला आहे.

यावेळी बोलताना आ. पडळकर म्हणाले, अहिल्यादेवी यांच्या भक्तांना केवळ शरद पवार यांच्या मुळेच अडवले जात आहे. धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्याची त्यांची मानसिकता आहे. यामुळे सर्वांनी शांततेत जावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच पवारांनी होळकरांच्या जमिनी लाटल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज २९७ वी जयंती नगरमधील चौंडी इथं साजरी करण्यात येतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा जन्मोत्सव सोहळा होत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही आज चौंडीत होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं जमा होऊ लागलेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com