Good Bye 2021 : राहुरीत गुन्हेगारीचा कहर

खून, अपहरण, दरोडा, दुकान अन् घरफोड्यांच्या घटना वाढल्या
Good Bye 2021 : राहुरीत गुन्हेगारीचा कहर

राहुरी |हेमंत मिसाळ| Rahuri

राहुरी तालुक्यात गेल्या वर्षभरात खून, अपहरण, दरोडा, दुकान अन् घरफोड्यांमुळे सरत्या वर्षात गुन्हेगारी ने कळस गाठला. यावर्षी सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याने रानं आबादानी होऊन मुळा धरण यंदा दोनवेळा पूर्ण क्षमतेने ओव्हरफ्लो झाले.

राहुरी कृषी विद्यापीठाच्या कृषी पदवीदान सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार हे एकाच व्यासपीठावर विराजमान झाले. यावेळी त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. डिग्रस येथे एका निलंबित पोलीस अधिकाऱ्यानेच दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. यावर्षी राहुरी तालुक्यात विविध संघटनांनी विविध मागण्यांसाठी केलेल्या आंदोलन आणि मोर्चामुळे वर्षभर आंदोलकांच्या घोषणांमुळे तालुका दणाणून गेला. यावर्षी झालेल्या अतीव पावसाने शेतकऱ्यांची शेती व पिके वाहून गेली. तर अनेक शेततळे अन् बंधारेही पावसामुळे वाहून गेले. यात शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले.

Good Bye 2021 : राहुरीत गुन्हेगारीचा कहर
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

यावर्षीही नगर-मनमाड महामार्गाच्या दुरूस्तीचे भिजत घोंगडे तसेच प्रलंबित राहिले. डॉ. तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी प्रलंबित पगारासाठी तब्बल १३ दिवस आंदोलन केले. तर त्यांच्या मागण्या मान्य करून खा. डॉ. सुजय विखे यांनी राहुरी कारखान्याची चाके पुन्हा फिरविण्यासाठी परिश्रम घेतले. तर प्रसाद शुगरनेही कार्यक्षेत्रातील ऊस तोडणीला प्राधान्य दिले.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघात विकासकामांची मोठी पायाभरणी केली. राहुरी विद्यापीठाच्या विकसित वाणांना राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. कांदा, कपाशी आणि उस ाला समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांनी नारजी व्यक्त केली. दरम्यान, उसाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा पिकाकडे मोर्चा वळविल्याने तालुक्यात कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. सरत्या वर्षात नेते आणि कार्यकर्त्यानी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Good Bye 2021 : राहुरीत गुन्हेगारीचा कहर
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचे ब्रेकअप; पण...

कृषी

- तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या.

- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा प्रयत्न

- भाजीपाला आणि कांद्याचे भाव मातीमोल झाल्याने शेतकरी संतप्त

- मुळा पाठोपाठ मुसळवाडी टेलटँक तुडूंब

- पिकांवरील रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

- ऑनलाईन पीक पाहणी नोंदणीत गोंधळ

- महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा

- अज्ञात रोगाने राहुरी तालुक्यातील पूर्वभागातील अनेक गाया व पाळीव जनावरे मृत्युमुखी पडले. तर सततच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर, दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी

Good Bye 2021 : राहुरीत गुन्हेगारीचा कहर
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

शिक्षण

- लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यानंतर शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांची भरली जत्रा

- राहुरी कृषी विद्यापीठात सुमारे ११ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पदवीदान करण्यात आले. यात बहुतांशी विद्यार्थीनींचा समावेश होता.

- शाळा, महाविद्यालये सुरू होताच अनेक ठिकाणी विविध स्पर्धा आणि संमेलनाची धूम सुरू झाली. सांस्कृतिक मेळाव्यांचीही भर पडली.

- वर्षाअखेरीस शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले.

- लॉकडाऊनमध्ये शाळा, महाविद्यालये बंद असल्याने अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या.

- अनेक दानशुरांनी संगणकाचे दान दिले.

Good Bye 2021 : राहुरीत गुन्हेगारीचा कहर
'या' ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट

राजकारण

- राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राहूरी तालुक्यातील काही निवडणुकांमध्येही स्थानिक महाविकास आघाडीचा राजकीय प्रयोग यशस्वी ठरला.

- देवळाली प्रवरात नगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजू लागल्याने सत्ताधाऱ्यांसह विर ोधक सक्रीय

- राहूरी पालिकेत सत्ताधारी विकासकामात वरचढ, तर विरोधकांचे ताबूत अद्यापही थंडच!

- देवळाली प्रवरा व राहुरी नगरपालिकेत रिपाइंच्या आंबेडकर व आठवले गटाचा स्वबळावर लढण्याचा इशारा

- सरत्या वर्षातील सरत्या महिन्यात तालुक्यातील चार जागांसाठी झालेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भाजपा दोन तर राष्ट्रवादी व अन्य आघाडीला एक जागा मिळाली.

- डॉ. तनपुरे कारखाना संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाल्याने शेवटचा गाळप हंगाम सुरू.

- तनपुरे-अॅड. पाटील यांची झाली गळाभेट

Good Bye 2021 : राहुरीत गुन्हेगारीचा कहर
Happy Birthday Tamannaah : 'मिल्क ब्युटी' तमन्नाचा आज वाढदिवस, जाणून घ्या तिच्याबद्दल...

क्राईम

- राहुरीच्या तुरूंगातून पाच कैदी पसार

- डिग्रसला एका महिला आणि मुलीला ओलीस ठेवून निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा पोलिसांवरच गोळीबार

- आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

- ब्राम्हणीत दूध संकलन केंद्रावर भेसळ पथकाचे छापे

- महसूल आणि पोलिसांच्या आर्थिक मेहेरबानीने मुळा व प्रवरा नदीपात्रातून वाळूतस्करी सुरू

- मुळा धरणावरील सीसीटीव्ही व पथदिवे बंद असल्याने धरणाची सुरक्षा धोक्यात आली.

- पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या; मुख्य आरोपीसह तिघेजण जेरबंद

- दातीर हत्या प्रकरणातील सूत्रधार नगरहून पसार; गुहा गावी बाबाच्या वेशात जेरबंद

- राहुरी, देवळाली प्रवरा, टाकळीमियाच्या बाजारातून मोबाईल चोरीला उधाण

- राहुरी तालुक्यात गुन्हेगारीने गाठला कळस.

Good Bye 2021 : राहुरीत गुन्हेगारीचा कहर
Katrina and Vicky : विकी-कतरिनाच्या हळदीचे फोटो पाहिलेत का?

सहकार

- सन २०२० ला तांत्रिक कारणामुळे उशिरा सुरू झालेला डॉ. तनपुरे कारखाना यंदा पुन्हा यशस्वीरित्या सुरू.

- धान्य खरेदीसाठी राहरीत केंद्राला मान्यता

- साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांचा शिवपुत्र पुरस्काराने सन्मान

- प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुर शराव वाबळे यांची साई संस्थानच्या विश्वस्तपदी निवड

- चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांचा टाटा पुरस्काराने सन्मान

- राहुरी बाजार समितीत कांदा उत्पादकांना मिळतोय समाधानकारक भाव.

- उसाच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

- गाळपासाठी ऊस मिळण्यासाठी डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या दारी. ऊस देण्याचे केले आवाहन.

Good Bye 2021 : राहुरीत गुन्हेगारीचा कहर
नगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव; नायजेरीयातून आलेल्या महिलेला ओमिक्रॉनची लागण

दखल

- देवळाली प्रवरा नगरपालिकेला स्वच्छता पुरस्कार, राष्ट्रपतींनी केला सन्मान

- राहरी नगरपरिषदेच्या सुधारीत पाणीपुरवठा योजनेचा श्रीगणशा; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची झाली स्वप्नपूर्ती

- गुहा गावाजवळ कंटेनर, प्रवासी जीप व दोन दुचाकीच्या अपघातात तीन ठार, १२ जण जखमी.

- राहुरीत भाजपाच्या मेळाव्यात खा. डॉ. सुजय विखे व माजीमंत्री शिवाजीराव कर्डिलेंची हजेरी.

- राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेत कार्यकर्त्यांचा उत्साह.

- मुसळवाडीसह नऊ गावच्या पाणीयोजनेचा अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे उडाला बोजवारा

- श्रीक्षेत्र ताहाराबादला गोपाळकाला उत्सव मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा

- बिबट्याच्या हल्ल्यात ताहाराबादचे वनसंरक्षक ठार

- राहुरीच्या पूर्वभागात अज्ञात रोगाने ४० हून अधिक जनावरे मृत्यूमुखी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com