गोंडेगांव परिसरात पावसाने पिकांना जीवदान

File Photo
File Photo

गोंडेगाव |वार्ताहार| Gondegav

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील गोंडेगाव (Gondegav) पंचक्रोशीत काल चांगला पाऊस (Rain) झाल्याने करपून गेलेल्या पिकांना जीवदान (Crops Life Save) मिळाले आहे. पाटबंधारे विभागाने (Department of Irrigation) आवर्तनाचे (Rotation)गाजर दाखविले. शेतकर्‍यांना फसवण्याचे काम केले असले तरी निसर्गाने शेतकर्‍यांना साथ दिेली आहे. आजही गोंडेगाव (Gondegav) पंचक्रोशीत पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारने मारलं आणि पावसाने तारलं या म्हणीचा प्रत्यय काल खर्‍या अर्थाने गोंडेगावकरांना आला आहे. गोंडेगावमध्ये (Gondegav) अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पाडला, आणि दोनच दिवसांत वरुण राजाने प्रथमच जोर धरला. हातातोंडाशी आलेला घास आता जातो की काय अशी अवस्था निर्माण झाली होती परंतु वरुणराजाने कृपा केल्यामुळे हे संकट दूर झाले.

आत्तापर्यंत गोंडेगाव (Gondegav) पंचक्रोशीमध्ये फक्त रिमझीम पाऊस (Rain) होता. त्यावरच शेतकर्‍यांनी सोयाबीन व इतर पिकांच्या पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर पाटबंधारे खात्याने सात नंबरचे फॉर्म भरून घेतले होते. परंतु त्यावर कोणताही विचार केला नाही. पाणी दिेले नाही पण शेतकर्‍यांकडून पाणीपट्टी वसूल (Water Bill Recovery) केली आहे. आजपर्यंतही पाण्याच्या आवर्तनाचा निर्णय झालेला नाही, एकीकडे गोदावरी नदीला (Godavari River) पाणी वाहून जात असून दुसरीकडे लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. आतातरी पाझर तलाव भरून देण्यासाठी पाणी सोडवे, अशी विनंती शेतकरी वर्गातून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com