श्रीरामपूर : प्रसिद्ध सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला मागितली दोन कोटीची खंडणी

एलसीबी पथक श्रीरामपुरात
श्रीरामपूर : प्रसिद्ध सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला मागितली दोन कोटीची खंडणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील मेनरोडवरील राम मंदिर चौक परिसरात असणारे पोपट भगीरथ महाले ज्वेलर्सचे मालक अमोल प्रकाश महाले (वय 42 वर्ष) यांना काल एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या तपासासाठी नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक श्रीरामपुरात दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे.

पोपट भगीरथ महाले ज्वेलर्सचे मालक अमोल प्रकाश महाले यांना त्यांच्या मोबाईलवर 6290540941 या क्रमाकांच्या मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीने फोन करून दोन कोटी रुपये घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील एका इमारतीत येण्याचे सांगितले. तसेच पोलिसांना कळवले तर जिवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. या घटनेची माहिती अमोल महाले यांनी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना दिली. त्यानंतर डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व शहर पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन 6290540941 या क्रमांकाच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. मात्र याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना मिळू शकली नाही.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अमोल प्रकाश महाले यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी रजिस्टर नं. 775/2022 नुसार अज्ञात इसमाविरुध्द भादंवि कलम 384, 385 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घायवट करीत आहेत. या घटनेमुळे व्यापार्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी असुरक्षित असल्याची भावना काहींनी व्यक्त केली. काल पोलीस उपअधीक्षक़ संदीप मिटके यांनी श्री. महाले यांच्या सराफ दुकानास बंदोबस्त दिला आहे.

लवकरच खंडणी मागणार्‍यास जेरबंद करु असा विश्वास संदीप मिटके यांनी व्यक्त केला. आरोपी परिसरातीलच असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे व अन्य पदाधिकार्‍यांनी पोलिस उपअधिक्षक संदीप मेटके याची भेट घेऊन या घटनेतील आरोपीचा कसून शोध घ्यावा, अशी मागणी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com