बटव्यात ठेवलेले दीड तोळे लंपास

केडगाव येथील घटना || पोलिसांत गुन्हा
बटव्यात ठेवलेले दीड तोळे लंपास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बटव्यात ठेवलेले महिलेचे सोन्याचे दीड तोळ्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी केडगाव उपनगरातील शाहुनगर भागात राहणार्‍या संध्या महिंद्र कांबळे (वय 41) यांनी मंगळवार, 9 ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान घर किंवा प्रवासादरम्यान ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांनी एक तोळ्याची मोहनमाळ, पाच ग्रॅमचे मंगळसूत्र व एक ग्रॅमचे कानातले त्यांच्याकडील बटव्यात ठेवले होते. तो बटवा घरातील रूममध्ये ठेवलेला होता. फिर्यादी व त्यांची मुलगी 8 ऑगस्ट रोजी श्रीगोंदा येथे जाण्यासाठी माळीवाडा बस स्थानकावर आल्या होत्या. त्यांनी बटवा सोबत आणला होता.

त्यावेळी त्या बटव्यामध्ये सोन्याचे दागिने नव्हते. तेव्हा फिर्यादी यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस नाईक कासार करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com