साईबाबांच्या चरणी भक्ताने वाहिला ४० लाखांचा सुवर्ण मुकुट!

साईबाबांच्या चरणी भक्ताने वाहिला ४० लाखांचा सुवर्ण मुकुट!

शिर्डी | शहर प्रतिनिधी

साईबाबांवर (Saibaba) देश-विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. हे भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरुन दान देत असतात.हैदराबाद येथील डॉ रामकृष्णा मांबा यांनी सुमारे ४० लाख रुपये किंमतीचा ७४२ ग्रँम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे.

दरम्यान अडीच हजार कोटीपेक्षा जास्त ठेवी तसेच सोने चांदीचा खजिना असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या झोळीत दिवसेंदिवस भक्तांकडून भरभरून दान प्राप्त होत असून श्री साईंच्या खजिण्यात वाढ होत आहे. (Sarvmat news)

डॉ रामकृष्ण मांबा
डॉ रामकृष्ण मांबा

शुक्रवार दि.२२ जुलै रोजी मध्यान्ह आरतीला हैदराबाद येथील डॉ रामकृष्ण मांबा आणी श्रीमती रत्ना मांबा यांच्या परिवाराने हजेरी लावून श्री साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी १९९२ साली साईबाबांना केलेल्या नवसाची फेड म्हणून पाऊण किलो वजनाचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला. (Shirdi Latest News)

याप्रसंगी निमगांव येथील साईनिवाराचे योगेश तिय्या, स्वप्निल शिंदे आदीसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ रामकृष्ण मांबा म्हणाले की, माझी श्री साईबाबांवर अतुट श्रद्धा असून बाबांकडे जे काही मागीतले त्या सर्व ईच्छा मनोकामना पुर्ण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com