नोकरदाराच्या गळ्यातील दोन तोळ्याची चेन चोरली

पुणे बस स्थानकावरील घटना || गुन्हा दाखल
नोकरदाराच्या गळ्यातील दोन तोळ्याची चेन चोरली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने एका नोकरदाराची दोन तोळ्याची सोन्याची चेन लंपास केली. पुणे बस स्थानकावर रविवारी (दि. 18) सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अंशुल नंदकुमार राऊत (वय 27 रा. कांदीवली, वेस्ट मुंबई, मुळ रा. सावनेर ता. सावनेर, जि. नागपुर) यांनी फिर्याद दिली आहे. अंशुल हे शनिवारी (दि. 17) सकाळी पत्नी, आई-वडिलांसह शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. तसेच रविवारी दुपारी ते शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून ते पुणे येथे जाण्यासाठी नगरमधील पुणे बस स्थानकावर आले होते. सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास ते बसमध्ये चढत असताना गर्दीच्या फायदा घेत त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने लंपास केली. सदरचा प्रकार अंशुल यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com