
लोणी |वार्ताहर| Loni
राहाता (Rahata) तालुक्यातील गोगलगाव (Gogalgav) शिवारात एका अनोळखी तरुणाचा (Youth) धारदार शस्र वापरून हत्या करून रस्त्यालगत मृतदेह (Dead Body) टाकून दिल्याची घटना घडली. दरम्यान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल (Murder Filed a Case) केला असून मृत व्यक्तीची ओळख पटण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
रविवारी लोणी पोलिसांना (Loni Police) याबाबत खबर मिळताच ते घटनास्थळी पोहचले. लोणी-तळेगाव रस्त्यावर (Loni Talegav Road) गोगलगाव शिवारात गोर्डे पेट्रोलपंपाच्या पुढे सोमनाथ भाऊसाहेब मगर यांच्या शेतजमिनीत तरवडाच्या झाडाजवळ हा मृतदेह (Dead Body) आढळून आला. मयत व्यक्ती 45 ते 55 वयाचा असून त्याच्या अंगात चेक्सचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व पायात विटकरी रंगाची चप्पल होती. त्याच्या छातीवर धारदार हत्याराने मारून त्याचा खून (Murder) केला. पोलिसांनी गुन्हा रजि.नंबर 445/23 भादवि कलम 302 प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल (Murder Filed a Case) केला.पुढील तपास सपोनि युवराज आठरे हे करीत आहेत.