गोडाऊन फोडताना एकाला पकडले

लालटाकी रोडवरील घटना : तोफखान्यात गुन्हा
चोरी
चोरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मेडिकलचे गोडाऊन फोडून बाटल्या चोरताना एकाला रंगेहाथ पकडले. लखन अनिल घोरपडे (रा. लालटाकी, अहमदनगर) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. मंगळवारी रात्री आठ वाजता लालटाकी रोडवरील सारंग मोटारसमोर ही घटना घडली. या प्रकरणी लखन घोरपडेविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र दयाळदास मेहता (वय 62 रा. लालटाकी रोड, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचे लालटाकी रोडवरील सारंग मोटारसमोर मेडिकल आहे. तेथेच मेडिकलचे सामान ठेवण्यासाठी गोडाऊन आहे. मंगळवारी रात्री आठ वाजेच्यासुमारास घोरपडे याने फिर्यादीचे गोडाऊन फोडून त्यातील बाटल्या चोरण्याचा प्रयत्न केला. सदरचा प्रकार फिर्यादीच्या लक्षात येताच त्यांनी त्यांच्या मुलाला आवाज दिला. बाप-लेकाने घोरपडे याला पकडून तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी घोरपडेविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com