गोंधवणी येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त

साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; डीवायएसपी मिटके यांची कारवाई
गोंधवणी येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील गोंधवणी येथील दारु अड्डे उद्ध्वस्त करुन पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील कच्चे रसायन, 7800 लिटर, तयार गावठी हातभट्टी दारू 248 लिटर व तसेच 50 किलो नवसागर, देशी दारू, तसेच 450 किलो गुळ एक टेंपो व एक दुचाकी असा एकूण 6 लाख 43 हजार 955 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 8 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 जणांंना अटक करण्यात आली आहे.

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत गोंधवणी परिसरात, वडारवाडा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील कच्चे रसायन, 7800 लिटर, तयार गावठी हातभट्टी दारू 248 लिटर व तसेच 50 किलो नवसागर, देशी दारू, तसेच 450 किलो गुळ एक टेंपो व एक दुचाकी असा एकूण 6 लाख 43 हजार 955 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

त्यानुसार श्रीकांत प्रभाकर काळे, (रा. कदम वस्ती, श्रीरामपूर), सागर माणिक शिंदे, (रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर), भीमराव काळे (रा अशोकनगर ता. श्रीरामपूर), दत्तात्रेय जानकीराम मंचरे (रा. वैजापूर), दीपक वसंत शेलार (रा. अशोकनगर), अशोक काशिनाथ शिंदे (पसार), बाप्पू नागू गायकवाड (पसार), अर्जुन फुलारे (पसार) सर्व राहणार गोंधवणी वडारवाडा, ता. श्रीरामपूर यांचेविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 (फ) (क), (ड), (इ) नुसार पोलिस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीनुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय श्रीरामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, डॉ. दिपाली काळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधिक्षक गणेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस उपअधिक्षक नितेश शेंडे, पोलीस निरीक्षक श्री. कोल्हे, पोलीस निरीक्षक श्री. हुलगे, पोलीस निरीक्षक श्री. वाजे आदींनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com