गोंधवणी येथे घरफोडीत 74 हजारांच्या दागिन्यांची चोरी
चोरी

गोंधवणी येथे घरफोडीत 74 हजारांच्या दागिन्यांची चोरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहराजवळ असलेल्या गोंधवणी गावातील वडारवाडा येथील रमेश राजाराम डुकरे यांच्या राहते घराचे कुलूप कापून चोरट्यांनी घरातील लाकडी दिवाणमध्ये ठेवलेले 74 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व कपाटातील 5 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. रविवारी रात्री चोरीचा हा प्रकार घडला.

तीन दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरात नासिर कादर सय्यद यांच्या खुशी एंटरप्रायजेस नावाचे भंगार मालाचे दुकान व गोडाऊन फोडून 80 हजार रुपये किमतीच्या भंगार मालाची चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच गोंधवणी गावात चोरीची घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर नगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणार्‍या सराईत गुन्हेगाराची टोळी पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर श्रीरामपूर शहरात चोरी व घरफोड्यांची जणू मालिकाच सुरू झाली आहे. आता या गुन्हेगारांनाही स्थानिक गुन्हे शाखेने अटक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.