दूध व्यवसायात चौरे कुटुंबियांनी आणलेले परिवर्तन दूध उत्पादकांना वरदान ठरणार - आ. राधाकृष्ण विखे पाटील

गोधन समूहाच्यावतीने शेतकरी मेळावा || 31 लाख रुपयांचे रिबेट शेतकर्‍यांच्या खाती जमा
दूध व्यवसायात चौरे कुटुंबियांनी आणलेले परिवर्तन दूध उत्पादकांना वरदान ठरणार - आ. राधाकृष्ण विखे पाटील

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

दूध व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल? दूध उत्पादन वाढविण्यासाठी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकर्‍यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागेल. गेल्या पाच वर्षांपासून दूध उत्पादकांसाठी गोधन समूहाच्या संस्थापक अध्यक्षा ज्योतीताई चौरे व पंचमहल डेअरीचे व्यवस्थापक प्रभाकर चौरे हे नवनवीन तंत्रज्ञान आणून प्रकल्प राबवित आहेत. त्यांचा आदर्श राज्यातील इतर दूध शितकरण केंद्रचालकांनी घ्यावा, चौरे दाम्पत्यांनी हा उपक्रम अविरतपणे चालू ठेवावा, दूध उत्पादकांना आर्थिक पाठबळ द्यावे, दूध व्यवसायात चौरे कुटुंबियांनी आणलेले परिवर्तन निश्चितच अभिमानास्पद असून शेतकर्‍यांना वरदान ठरणारे आहे. शेतकर्‍यांना दिवाळसणानिमित्त रिबेट वाटप करून व त्यांचा सपत्नीक सत्कार केल्याने त्यांचे प्रोत्साहन वाढत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द येथे गोधन अ‍ॅग्रो फार्मस् यांच्यावतीने भव्य दूध उत्पादक शेतकरी मेळावा व दिवाळीनिमित्त दूध उत्पादकांना रिबेट वाटपप्रसंगी आ.विखे बोलत होते. यावेळी दूध उत्पादकांना गोधन अ‍ॅग्रो फॉर्मस् यांच्यावतीने सुमारे 31 लाख रुपयांचे रिबेट वाटप करून चौरे कुटुंबियांनी शेतकर्‍यांची दिवाळी गोड केल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते रिबेटचे वाटप करण्यात आले.

व्यासपीठावर पंचमहल (अमूल)डेअरीचे व्यवस्थापक प्रभाकर चौरे, गोधन अ‍ॅग्रो फॉर्मसच्या संस्थापक अध्यक्षा सौ.ज्योतीताई चौरे, अध्यक्ष निखील चौरे, पियुष चौरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, केशव शिंदे, नाना जुंधारे, सरपंच सर्जेराव सोळंके, उत्तमराव आढाव, दिलीप लांडगे, मधुकर पवार, आबासाहेब पवार, शिवाजी शिंदे, सुभाष करपे, साहेबराव निमसे, पंकज आढाव, ज्ञानेश्वर कोळसे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. विखे म्हणाले, पूर्वी महाराष्ट्रात अनेक सहकारी दूध संस्था होत्या. ते आपल्या राज्याचे वैभव होते. त्यातून राज्यात धवलक्रांती झाली. मात्र, आता या संस्था हळूहळू नामशेष होत गेल्या. या पार्श्वभूमीवर राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या अनेक खासगी दूध संस्थांनी खर्‍या अर्थाने दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. राज्यासह नगर जिल्ह्यात आता अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील, अशा संस्था अस्तित्वात आहेत. त्या संस्था दूध उत्पादकांना रिबेट वाटप करून दिवाळी गोड करण्याबरोबरच त्यांचा विश्वास संपादन करतात, त्यात गोधनचा अग्रक्रम असल्याचे गौरवोद्गार आ. विखे यांनी काढले.

प्रभाकर चौरे म्हणाले, गोधन परिवारावर दूध पुरवठादार शेतकरी व डेअरी चालक यांचे मोठे पाठबळ आहे. सर्वांच्या परिश्रमामुळे आज हा समूह नावारूपाला आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी दिवाळसणाचे औचित्य साधून सर्वांचीच दिवाळी गोड करण्याचा आमचा मानस आहे. यावेळी गोधनच्या संस्थापिका ज्योतीताई चौरे म्हणाल्या, शेतकर्‍यांच्या कुटुंबातील महिलाही परिश्रमाला मागे राहिलेल्या नाहीत. त्यांचेही शेतीत मोठे योगदान असते. आज या महिलांमुळेच शेती आणि शेतकर्‍यांची मेहनत फळाला आली आहे. निखील चौरे म्हणाले, गोधन संस्थेवर दूध पुरवठादार शेतकर्‍यांनी विश्वास दाखवून आम्हाला प्रेरणा आणि पाठबळ दिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानून या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश पवार, आप्पासाहेब पवार, राजेंद्र गायकवाड, राजेश खांडेकर, सुनील शेळके, गोविंद तांबे, अरुण सोळुंके, निवृत्ती देठे, अनिल टेकाळे, पियुष शिंदे, आसिफ शेख, केशव काळे, प्रदीप देशमुख, दिलीप सोनवणे, संकेत बनकर, दत्तात्रय सुंबे, अरूण फालके, सुरेश चिंधे, संदीप बारसे, पृथ्वीराज जुंधारे, प्रवीन बनकर, चंद्रकांत डुकरे, विजय घुगे, राजेंद्र तरस, अंकुश चौरे, प्रवीण जायभाय, महेश कोळसे, गणेश शिंदे, राजेश खांडेकर, दीपक लांडगे, नवनाथ खुळे, विकास मगर, विकास आढाव, अमोल आढाव, विजय जगताप, गणेश ठोसर, शेषराव जाधव, आशुतोष माकोणे, गौरव जुंधारे, ज्ञानेश्वर टेकाळे, गणेश बडाख, योगेश देवकर, सतीश वाळुंज, किरण रोहकले, गणेश बर्‍हाटे, विनोद लहारे आदींसह दूध संकलन चालक, शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com