गोदावरीतून वाहिले 71 टीएमसी पाणी

 File Photo
File Photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

1 जून पासून तर मंगळवारी सकाळी 6 पर्यंत नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत 71 टिएमसीचा विसर्ग करण्यात आला. म्हणजेच 8 लाख 22 हजार 168 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे.

यंदा जूनमध्ये पावसाचे प्रमाण सुरुवातीला कमी होते. मात्र जुलैमध्ये पावसाने मनावर घेतले. पहिल्या पंधरा दिवसांत पावसाने मुसळधार आगमन करत धरणांमध्ये समाधानकारक साठे निर्माण केले. त्यामुळे यंदा धरणं वेळेवर भरली. परिणामी पावसाच्या येणार्‍या अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदावरी नदीत बरेच दिवस काठोकाठ पाणी वाहिले. सह्याद्रीचा घाटमाथा पावसाने झोडपून काढला. त्यामुळे पाणलोटात पाउस थांबला होता तरी नविन पाण्याची आवक सुरुच होती. अनेक ठिकाणी लहान मोठे झरे सुरुच होते.

7.1 टिएमसी क्षमतेच्या दारणातून काल सकाळी 6 पयर्ंत 18 टिएमसी पाण्याचा विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या दिशेने झाला. काल या धरणात 95.86 टक्के पाणीसाठा आहे. 7149 क्षमतेच्या (7.1 टिएमसी) या धरणात 6.8 टिएमसी पाणीसाठा आहे. मुकणे धरणात 98.04 टक्के पाणी साठा आहे. 7.2 टिएमसीच्या या धरणात 7 टिएमसी पाणी साठा आहे. या धरणातून 737 दलघफू म्हणजेच जवळपास पाउण टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गंगापूर धरणातून 6.2 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

5630 दलघफू क्षमतेच्या या धरणात 5637 दलघफू पाणीसाठा आहे. गंगापूरमध्ये 94.80 टक्के पाणी साठा आहे. कडवा धरणात 91.11 टक्के पाणीसाठा आहे. 1688 दलघफू क्षमतेच्या या धरणात 1528 दलघफू पाणीसाठा आहे. या धरणातून 4.2 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. अन्य धरणांचे साठे असे- वाकी 92.17 टक्के, भाम 100 टक्के,भावली 100 टक्के, कश्यपी 98.33 टक्के, गौतमी गोदावरी 98.45 टक्के, आळंदी 100 टक्के, भोजापूर 100 टक्के, पालखेड 75.70 टक्के असे साठे आहेत. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये काल 94.76 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. कालच्या तारखेला मागील वर्षी हा साठा 70.80 टक्के इतका होता.

काल मंगळवारी दिवसभरात गंगापूर च्या भिंतीजवळ 7 मिमी, गौतमी 11 मिमी, कश्यपी 5 मिमी, त्र्यंबक 15 मिमी, अंबोली 25 मिमी असा पाऊस नोंदला गेला. काल सायंकाळी 6 वाजता दारणातून 2636 क्युसेक, मुकणेतून 363 क्युसेक, कडवातुन 788 क्युसेक, वालदेवीतून 183 क्युसेक, गंगापूर मधून 1206 क्युसेक, आळंदी 30 क्युसेक, भोजपूर 75 क्युसेक, पालखेड 1215 क्युसेक तर नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत 9465 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. काल अखेरपर्यंत गोदावरीत 71 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

राहाता तालुक्याची पावसाची साधारण सरासरी 285.4 मिमी आहे. राहाता तालुक्यात पावसाची संमिश्र स्थिती आहे. काही भागात जास्त तर काही भागात कमी, शहरी भागात चांगला पाऊस तर ग्रामीण भागात कमी अशी स्थिती आहे. तालुक्यात अजुनही ओढे नाले भरून वाहिलेले नाही. मात्र हलक्या ते मध्यम पावसाने खरीप सध्यातरी तग धरून आहे. धरणं भरली असली तरी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात पावसाचे धुव्वाधार आगमन झालेच नाही. मात्र हलका ते मध्यम आणि कधीकधी जोरदार तोही अल्पकाळ असा पाऊस झाला. पावसाच्या आकडेवारीची बेरीज वाढली असली तरी त्याचा प्रभाव फारसा दिसून येत नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com