गोदावरीत 17000 क्युसेकने पाणी
सार्वमत

गोदावरीत 17000 क्युसेकने पाणी

दारणाचा विसर्ग 16238 क्युसेक, जायकवाडी 61.54 टक्के

Arvind Arkhade

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल सकाळी संपलेल्या 24 तासात दारणाच्या पाणलोटात धुव्वाधार पाऊस झाल्याने दारणात 696 दलघफू नविन पाणी दाखल झाले. दिवसभर पाण्याची आवक सुरुच असल्याने दारणाचा विसर्ग 7958 क्युसेकवरुन 16238 क्युसेक करण्यात आला.

हे पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने काल सायंकाळी 7 वाजता गोदावरीतील विसर्ग 14234 इतका होता. दारणाचे पाणी दाखल झाल्यानंतर हा विसर्ग 17000 क्युसेकच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. इगतपूरी तालुक्यातील भावली, दारणा पाठोपाठ भाम धरणही 100 टक्के भरले आहे.

दारणाच्या पाणलोटात काल सकाळी संपलेल्या 24 तासात इगतपूरी येथे 119 मिमी पावसाची नोंद झाली. घोटीला 74 तर दारणाच्या भिंतीजवळ 37 मिमी पावसाची नोंद झाली. भावलीला 176 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दारणात सकाळ पर्यंत 696 तर भावलीत 86 दलघफू नविन पाणी दाखल झाले.

पाण्याची आवक वाढत गेल्याने दारणाचा विसर्ग सुरुवातीला दुपारी 12 वाजता तो 12278 क्युसेक इतका होता त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढत जावुन तो 16238 क्युसेक इतका करण्यात आला. हे पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या दिशेने वाहत असल्याने या बंधार्‍यात पाण्याची आवक वाढल्याने या बंधार्‍यातुन गोदावरीतील विसर्ग शनिवारी सायंकाळी 9 ते 10 वाजता 17 हजार क्युसेकच्या पुढे विसर्ग जावु शकणार आहे.

त्यामुळे गोदापात्रातील जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा वेग वाढत आहे. काल सकाळी 6 पर्यंत गोदावरीतुन जायकवाडीच्या दिशेने सव्वासात टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

गंगापूर धरण काल सकाळी 71.20 टक्क्यांपर्यत पोहचले होते. 5630 क्षमतेच्या या धरणात 4009 दलघफू पाणी साठा तयार झाला होता. काल सकाळी 6 पर्यंत गंगापूरला 35, त्र्यंबकला 48, अंबोलीला 86 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणात 241 दलघफू पाणी दाखल झाले. कश्यपी 33.58 टक्के, गौतमी धरणात 44.31 टक्के इतका साठा झाला आहे.

काल शनिवारी दिवसभरातील 12 तासात गंगापूरला 40, त्र्यंबकला 28, गौतमीला 41, कश्यपीला 19, अंबोलीला 82 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे रात्रीतुन गंगापूर 75 टक्क्यांपर्यंत पोहचलेले असेल असा अंदाज आहे.

जायकवाडी 61.54 टक्के !

जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता 24 हजार क्युसेकने नविन पाण्याची आवक होत होती. काल 6 वाजता या धरणात 61.54 टक्के पाणी साठा होता. उपयुक्तसाठा 47.19 टिएमसी तर मृतसह एकूण साठा 73.26 टिएमसी इतका झाला होता. या धरणासाठी मेंढेगिरी समिती प्रमाणे आता या धरणात 3 टिएमसी पाण्याची गरज आहे. त्यानंतर या धरणात पाणी सोडण्याची गरज पडणार नाही. 76 च्या 65 टक्के म्हणजेच जवळपास 50 टिएमसी पाण्याची गरज आहे. आणि आता 47.19 टिएमसी पाणी साठा तयार झाला असल्याने आता अवघा तिन टिएमसी पाण्याची गरज आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com