गोदावरीचा विसर्ग 5778 क्युसेकवर

पाऊस ओसरला : गंगापूरचा विसर्ग बंद, दारणाचा घटला
गोदावरीचा विसर्ग 5778 क्युसेकवर

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

सह्यद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरल्याने दारणा (Darna), गंगापूर धरणातील (Gangapur Dam) विसर्ग घटविण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरीतील विसर्ग (Godavari) 9667 वरून 5778 क्युसेक इतका कमी करण्यात आला आहे. काल रात्री गंगापूरचा विसर्ग बंद करण्यात आला.

काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 9 मि.मी, इगतपुरीला (Igatpuri) 16 मि.मी, घोटीला 26 मि.मी पावसाची नोंद झाली. पाण्याची आवक कमी झाल्याने दारणाचा (Darna) विसर्ग 5540 वरून काल सकाळी 9 वाजता 3120 क्युसेक वर आणण्यात आला. त्यानंतर तो उशीरापर्यंत स्थिर होता.

गंगापूर धरणाच्या (Gangapur dam) पाणलोटात पाऊस घटला आहे. गंगापूरला 25 मि.मी, त्र्यंबकला 27 मि.मी, तर अंबोली येथे 34 मि.मी पावसाची नोंद झाली. 24 तासांत गंगापूर मध्ये 162 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. काल सकाळी गंगापूरचा विसर्ग 3068 क्युसेक इतका होता. सकाळी 9 वाजता 1090 क्युसेकवर आणण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता 208 क्युसेक इतका कमी करण्यात आला. नंतर काल रात्री 9 वाजता हा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

गंगापूर, दारणातील विसर्ग कमी झाल्याने नांदूरमधमेश्वर (Nandurmadhameshwar) बंधार्‍यातून गोदावरीतील विसर्ग घटला आहे. काल सकाळी हा विसर्ग 9667 क्युसेक इतका होता. तो कमी करत सायंकाळी 6 वाजता तो 5778 क्युसेकवर आणण्यात आला होता. काल सकाळी 6 पर्यंत एकूण 1866 दलघफू पाण्याचा विसर्ग गोदावरीत जायकवाडीच्या (Jayakwadi) दिशेने करण्यात आला आहे.

धरण साठे असे -

दारणा 77.75 टक्के, मुकणे 48.29 टक्के, वाकी 39.77 टक्के, भाम 72.76 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी 100 टक्के, गंगापूर 78.28 टक्के, कश्यपी 46.49 टक्के, गौतमी गोदावरी 54.49 टक्के, आळंदी 66.92 टक्के, भोजापूर 14.95 टक्के, पालखेड 58.82 टक्के.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com