पाऊस थांबल्याने गोदावरीचा विसर्ग 807 क्युसेकवर

File Photo
File Photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

लाभक्षेत्रात पाऊस थांबला तसा तो धरणक्षेत्रातही थांबला आहे. त्यामुळे धरणातील विसर्ग घटले आहेत. गोदावरीतुन काल सायंकाळी अवघा 807 क्युसेक ने विसर्ग सुरु होता. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातुन जाकवाडीच्या दिशेने गोदावरीत 75 टिएमसी पाणी वाहुन गेले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासुन धरणांच्या पाणलोटातही पावसाने विश्रांती घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणे 95 टक्क्यांच्या पुढे आहेत. भाम, भावली, वालदेवी, आळंदी, भोजापूर, ओझरखेड, वाघाड, तिसगाव, हरणबारी, केळझर ही 10 धरणं 100 टक्के भरलेली आहेत. दारणा 96.68 टक्के, मुकणे 98.04 टक्के, गंगापूर 94.80 टक्के, कश्यपी 98.33 टक्के, गौतमी गोदावरी 98.45 टक्के, कडवा 92.30 टक्के, पालखेड 84.38 टक्के, करंजवण 93.13 टक्के, अदि धरणे तांत्रिक दृष्ट्या भरली आहेत. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये मागील वर्षी कालच्या तारखेला 72.20 टक्के पाणी साठा होता. काल तो 96.07 टक्के इतका आहे. नाशिक जिल्ह्यातील या धरणांमध्ये 48.4 टिएमसी पाणी साठा उपयुक्त आहे.

काल सायंकाळी 6 वाजता दारणा 250 क्युसेक, वालदेवी 183 क्युसेक, आळंदी 30 क्युसेक, असे विसर्ग धरणांमधुन सुरु होते. अन्य धरणांमधील विसर्ग बंद करण्यात आले आहेत. 1 जून पासुन विसर्ग एकूण करण्यात आलेले विसर्ग असे- दारणा 19 टिएमसी, गंगापूर 6.5 टिएमसी, कडवा 4.4 टिएमसी, मुकणे 844 दलघफू, भोजापूर 878 दलघफू, आळंदी 1 टिएमसी, वालदेवी 645 दलघफू. असे विसर्ग करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com