
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
पावसाने विश्रांती घेतल्याने दारणा धरण वगळता सर्व धरणांची आवक दोन अंकी दलघफू आहे. त्यामुळे काही धरणांमधील विसर्ग बंद करण्यात आले आहेत. नांदूरमधमेश्वर बंधार्यातून गोदावरीतील विसर्ग 3155 क्युसेकवर आला आहे. खाली जायकवाडी धरणातील विसर्ग कमी करण्यात आला असून काल रात्री 8 वाजता हा विसर्ग 21003 क्युसेकने सुरु होता.
दारणातून 1100 क्युसेक, वालदेवीतून 183 क्युसेक, आळंदी 110 क्युसेक, भोजापूर 539 क्युसेक, पालखेडमधून 752 क्युसेक, होळकर ब्रीज 278 क्युसेक असा विसर्ग सुरु होता. अन्य धरणातील विसर्ग बंद करण्यात आले आहेत. यामुळे काल नांदूरमधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीतील विसर्ग 3155 क्युसेकवर आणण्यात आला. गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने काल सकाळी 6 पर्यंत एकूण 46.3 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.