
अस्तगाव |वार्ताहर| Astgav
नांदूरमधमेश्वर (Nandurmadhameshwar) बंधार्याची घटलेला साठा (Decreased stocks) पूर्ण झाल्यानंतर गोदावरीत (Godavari) 12 तासांनंतर पुन्हा गोदावरीत विसर्ग (Godavari Visarg) सुुरु करण्यात आला आहे. काल सकाळी 404 क्युसेकने विसर्ग करण्यास सुरुवात झाली. हा विसर्ग नंतर वाढवत काल दुपारी 3 वाजता तो 1614 क्युसेकवर नेण्यात आला. त्यामुळे गोदावरीत पाण्याचा खळखळाट सुरुच राहणार आहे.
दारणा धरणातून (Darna Dam) 1294 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. भावलीतून (Bhavali) 135 क्युसेकने विसर्ग दारणात दाखल होत आहे. दारणा तसेच भावलीच्या परिसरात अधूनमधून दमदार सरी बरसत आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील धबधबे सुरू आहेत. ते ही पाणी दाखल होत आहे. दारणात 24 तासांत 137 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. वालदेवीतून 65 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. खाली नांदूरमधमेश्वर (Nandurmadhameshwar) बंधार्यात हे पाणी दाखल होत आहे. या शिवाय फ्री कॅचमेंटमधील (Free catchment) पाणीही नांदूरमधमेश्वर बंधार्यात दाखल होत असल्याने या बंधार्यातून विसर्ग करण्यात येत आहे. काल सकाळी 404 क्युसेकने पाणी पुन्हा या बंधार्यातून गोदावरीत सोडणे सुरु झाले. हा विसर्ग 11 वाजता 1200 इतका करण्यात आला. त्यानंतर तो 3 वाजता 1614 क्युसेक इतका करण्यात आला. त्यामुळे गोदावरीत पुन्हा वाहती झाली आहे.
काल सकाळी 6 पर्यंत गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने नांदूरमधमेश्वर (Nandurmadhameshwar) बंधार्यातून 3.5 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत नाशिकच्या धरणांमध्य (Nashik Dam) कालच्या तारखेला उपयुक्त साठा 57.80 टक्के झाला. मागील वर्षी कालच्या तारखेला उपयुक्त साठा (Water Storage) 37.57 टक्के इतका होता. यावर्षी स्थिती चांगली असली तरी मुसळधार पावसाची गरज आहे. जायकवाडीला पाणी (Jayakwadi Water) अपेक्षित जाणे गरजेचे आहे. कोपरगाव (Kopargav) तसेच राहाता (Rahata) तालुक्यातील शेतकर्यांचे लक्ष जायकवाडीच्या पाणी साठ्यावर आणि गोदावरीतून (Godavari) किती पाणी वाहून जाते याकडे आहे.