गोदावरीत 10272 क्युसेकने विसर्ग

दारणाच्या पाणलोटात मुसळधार || जायकवाडी 55.20 टक्क्यांवर
 File Photo
File Photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

नाशिकच्या (Nashik) घाटमाथ्यावर काल दिवसभर मुसळधार पाऊस (Rain) सुरु होता. काल रात्री 9 वाजता दारणातून (Darna) 10060 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. तर याच वेळी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून (Nandurmadhameshwar Bandhar) जायकवाडीच्या (Jayakwadi) दिशेने गोदावरीत (Godavari) 10272 क्युसेकने विसर्ग सुरु होता. खाली जायकवाडी जलाशयाचा उपयुक्तसाठा (Jayakwadi Water Storage) काल सायंकाळी 6 वाजता 55.20 टक्क्यांवर पोहचला आहे. 42.32 टीएमसी उपयुक्त साठा झाला आहे.

काल दारणा (Darna), भावली (Bhavali) तसेच इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील अन्य धरणांच्या पाणलोटात (Dam watershed) दिवसभर जोरदार पावसाची रिपरिप सुरु होती. काल दिवसभरातील 12 तासांत भावलीला 60 मिमी पावसाची नोंद झाली. तर दारणाच्या (Darna) भिंतीजवळ 27 मिमी पावसाची नोंद झाली. इगतपुरी (Igatpuri), घोटी (Ghoti) या दारणाच्या पाणलोटात (Darna watershed) जोरदार पाऊस होत आहे. भाम (Bham), भावलीतील (Bhavali) पाणी दारणात दाखल होत आहे. भावलीतून 481 क्युसेक, भाम मधुन 2250 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात 96.89 टक्के असलेल्या दारणात (Darna) 292 दलघफू नवीन पाणी दाखल झाले.

त्यामुळे काल सकाळी 6 वाजता सुरु असलेला दारणाचा 3425 क्युसेक हा विसर्ग काल सायंकाळी 6 वाजता 7200 क्युसेकवर नेण्यात आला. या विसर्गात खाली कडवा 1696 क्युसेक, आळंदीतून 30 क्युसेक, वालदेवीतून 30 असा विसर्ग दारणाच्या विसर्गात मिसळत असल्याने खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात पाण्याची आवक वाढत आहे. काल सकाळी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडी च्या दिशेने गोदावरीत 5173 क्युसेक वरुन काल सायंकाळी 6 वाजता 7117 क्युसेक इतका करण्यात आला.

हा विसर्ग रात्री 9 वाजता 9 हजार क्युसेक च्या पुढे गेलेला असेल. त्यामुळे गोदावरी दुथडी होण्याची चिन्हे आहेत. पाऊस टिकून राहिल्यास गोदावरी वाहती राहणार आहे. काल सकाळ पर्यंत गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीतुन 6.2 टीएमसी पाणी या हंगामात वाहिले आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोटात दारणाच्या तुलनेत कमी पाऊस आहे. मात्र नाशिक परिसरात काल जोरदार पाऊस झाला. गंगापूरचा साठा 94.21 टक्क्यांवर स्थिर आहे. कश्यपी 71.22 टक्के, गौतमी गोदावरी 78.16 टक्के झाले आहे.

जायकवाडी 55.20 टक्के भरले

खाली जायकवाडीत काल सायंकाळी 6 च्या आकडेवारीनुसार जायकवाडीचा उपयुक्तसाठा 42.32 टीएमसी इतका झाला होता. सहा वाजता जायकवाडी जलाशयात 11 हजार क्युसेकने नवीन पाणी दाखल होत होते. या जलाशयात 55.20 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता. काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासात जायकवाडीत पाऊन टीएमसी हुन अधिक पाणी दाखल झाले होते. काल सकाळी 54.57 टक्के असलेला पाणीसाठा 12 तासानंतर सायंकाळी 6 वाजता 55.20 टक्क्यांवर पोहचला होता.

जायकवाडीतील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने नगर, नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्याची चिंता मिटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com