गोदावरी दुथडी ! 9937 क्युसेकने विसर्ग

गंगापूरमधून 3068 क्युसेकने तर दारणातून 5540 क्युसेकने विसर्ग
गोदावरी दुथडी ! 9937 क्युसेकने विसर्ग

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

गंगापूर धरणातून (Gangapur Dam) काल 3068 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता, तर दारणातून (Darna) 5540 क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने खाली नांदूमधमेश्वर (Nandumadhameshwar) बंधार्‍यातून गोदावरीत (Godavari) काल 9637 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे.

गंगापूर धरण (Gangapur Dam) काल सकाळी 6 वाजता 78.54 टक्के झाल्यानंतर या धरणाचे पहिल्यांदाच दरवाजे उघडण्यात आले आहे. काल सकाळी 10 वाजता 545 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर 12 वाजता विसर्ग वाढविण्यात आला. तो 1090 क्युसेक करण्यात आला. दुपारी 2 वाजता 1522 क्युसेक तर सायंकाळी 4 वाजता 3068 क्युसेक ने विसर्ग सुरू होता. तो उशीरापर्यंत टिकून होता. 5630 क्षमतेच्या गंगापूरमध्ये काल सकाळी 4422 दलघफू पाणीसाठा (Water Storage) होता.

78.54 टक्के असलेला साठा 75 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रात पावसाचे सातत्य आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत गंगापूरच्या भिंतीजवळ 60 मिमी पाऊस नोंदला गेला. या धरणाच्या पाणलोटातील अंबोलीला (Amboli) 120 मिमी पावसाची नोंद झाली. तर त्र्यंबक येथे 35 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर समुहातील कश्यपी 44.70 टक्के तर गोदावरी गौतमी हे धरण 51.18 टक्के भरले आहे.

दारणाचा विसर्ग काल सकाळी 6 वाजे पासून उशीरा पर्यंत 5540 क्युसेक इतका टिकून होता. कालही धरणक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. इगतपुरी तसेच घोटी परिसरात पावसाची अधुन मधून रिपरिप सुरुच आहे. 78.14 टक्क्यांवर हे धरण स्थिर आहे. या धरणात पाणलोट क्षेत्रासह भावलीचे 481 क्युसेकने पाणी दाखल होत आहे. वालदेवीतूनही 65 क्युसेकने पाणी विसर्गाच्या रुपात बाहेर पडत आहे. काल सकाळी 6 पर्यंत एकूण एक टीएमसीचा विसर्ग दारणातून करण्यात आला आहे. दारणाच्या पाणलोटातील (watershed of Darna) इगतपुरी (Igatpuri) येथे काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासात 60 मिमी, घोटी येथे 45 मिमी तर दारणाच्या भिंतीजवळ 17 मिमी पावसाची नोंद झाली आहे. भावली 100 टक्के भरल्याने या धरणातून 481 क्युसेकने विसर्ग बाहेर पडत आहे.

दारणा तसेच गंगापूरचा विसर्ग खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने तेथून गोदावरीत विसर्ग काल वाढविण्यात आला आहे. काल सकाळी गोदावरीत 2623 क्युसेकने पाणी सोडणे सुरु होते. गंगापूरचे पाणी दाखल झाल्यानंतर काल दुपारी 3 वाजता विसर्ग 4464 इतका करण्यात आला. सायंकाळी 5 वाजता 6512 क्युसेक इतका करण्यात आला. तर सहा वाजता 9637 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे. यासाठी नांदूरमधमेश्वर बंधार्‍याचे तीन वक्राकार दरवाजे एक एक मिटर उचलण्यात आले आहेत. नदीपात्र यामुळे दुथडी भरुन वाहु लागले आहे. हे पाणी जायकवाडी (Jaykwadi) जलाशयाच्या दिशेने जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com