
अस्तगाव |वार्ताहर| Astgav
नांदूरमधमेश्वर बंधार्यातून (Nandurmadhameshwar) गोदावरीत (Godavari) सोडण्यात येणारा विसर्ग 1614 क्युसेकवरून 3228 क्युसेक इतका करण्यात आला आहे. तसेच दारणाचा (Darna) विसर्ग 1294 क्युसेकवरून 1896 क्युसेक इतका करण्यात आला आहे.
दारणा (Darna) तसेच गंगापूरच्या पाणलोटात (watershed of Gangapur) काल सकाळी संपलेल्या 24 तासांत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दारणाच्या (Darna) भिंतीजवळ 9 मिमी, पाणलोटातील घोटी येथे 47 मिमी, तर इगतपुरी येथे 67 मिमी पावसाची नोंद झाली. भावली येथेही 49 मिमी पावसाची नोंद झाली. भावली पूर्ण क्षमतेने भरले असल्याने या प्रकल्पातून 135 क्युसेकने विसर्ग दारणाच्या दिशेने सुरू आहे. वालदेवीतूनही 241 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पाऊस आणि धरणातील विसर्ग असे नविन पाणी 75 टक्के पाण्याचा साठा (Water Storage) स्थिर ठेवून दारणातून विसर्ग सुरू आहे. काल सकाळी 1896 क्युसेकने विसर्ग सुरू होता. त्या आगोदर तो 1294 क्युसेक इतका होता. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या 24 तासांत 141 दलघफू नविन पाणी दाखल झाले.
गंगापूरचा साठा (Gangapur Water Storage) 76.45 टक्क्यांवर स्थिर आहे. या धरणातून (Dam) सोडण्यात येणारा विसर्ग बंद आहे. काल या धरणाच्या पाणलोटातील अंबोली येथे 34 मिमी, त्र्यंबकला 27 मिमी पावसाची नोंद झाली. तर गंगापूरच्या भिंतीजवळ 25 मिमी पावसाची नोंद झाली. 24 तासांत गंगापूर मध्ये 21 दलघफू नविन पाणी दाखल झाले.
दारणातील विसर्ग तसेच फ्री कॅचमेंट मधील पाणी नांदूरमधमेश्वर बंधार्यात दाखल होत आहे. हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे त्यातुन गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरू आहे. काल सकाळी 6 वाजता 1614 क्युसेकने नांदूरमधमेश्वर बंधार्यातून विसर्ग सुरू होता. नविन येणारे पाणी वाढल्याने या बंधार्यातून सकाळी 9 वाजता 2018 क्युसेक विसर्ग करण्यास सुरुवात झाली. नंतर तो दुपारी 3 वाजता 3228 क्युसेक इतका करण्यात आला. हा विसर्ग रात्री उशीरापर्यंत टिकून होता.