
नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa
मित्रांसमवेत गोदावरी नदीत (Godavari River) आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू (Youth Drowns Death) झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) सुरेगावगंगा (Suregav Ganga) येथे घडली.
याबाबत माहिती अशी की, सुरेगावगंगा (Suregavganga) येथील श्रीकांत गणेश शिंदे (वय 19) हा युवक सकाळी 8 वाजेच्या दरम्यान गोदावरी नदीपात्रात (Godavari River) आंघोळीसाठी मित्रांसमवेत गेला होता. पोहत असताना नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा मृत्यू (Death) झाला. सदर घटनेची खबर अंकुश ज्ञानदेव शिंदे यांनी नेवासा पोलीस स्टेशनला (Newasa Police Station) दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, हवालदार बबन तमनर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा हे घटनास्थळी हजर झाले.
त्यानंतर परिसरातील युवकांनी बराच वेळ नदीपात्रात शोध घेतला असता सदर युवकाचा शोध लागला नाही. त्यानंतर नेवासा पोलीस स्टेशनने (Newasa Police Station) शहरटाकळी (ता. शेवगाव) येथील गोताखोर पथकास पाचारण केले असता त्यांनी ऑक्सीजन सिलेंडर च्या साह्याने नदीपात्राच्या तळाशी शोध घेतला असता या युवकाचा मृतदेह या पथकाला रविवारी सायंकाळी मिळून आला.
नेवासा फाटा (Newasa Phata) येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास हवालदार बबन तमनर हे करत आहेत. या युवकाचे बारामती (Baramati) येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण सुरू होते. सुरेगावगंगा येथील माजी सरपंच नरसिंगराव शिंदे यांचा तो नातू होता.