गोदापात्रात केतन कुटे या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

गोदापात्रात केतन कुटे या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरातील खडकी येथील रहिवासी असलेला केतन बापू कुटे (वय 23) हा दि.13 फेब्रुवारीपासून घरातून निघून गेला होता. त्याचा मृतदेह दि. 16 फेब्रुवारी रोजी कोपरगाव शहरालगत गोदावरी नदीपात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर तरुणाने मोठ्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यासंदर्भात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोपरगाव शहरातील खडकी येथील केतन बापू कुटे हा तरुण भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचा. तो रविवारी घरातून निघून गेला होता. दुसर्‍या दिवशी सोमवारी त्याच्याकडील दुचाकी ही गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावर असल्याची माहिती मिळाली.दरम्यान त्याचा मृतदेह 16 फेब्रुवारी रोजी कोपरगाव शहरालगत गोदावरी नदी पात्रात आढळून आला आहे.

सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अमोल बापू कुटे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत केतन याच्या पश्चात एक मोठा भाऊ व आई आहे. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com