गोदावरीत नदीत युवकाचा मृतदेह आढळला
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
कोपरगांव (Kopargav) तालुक्यातील धारणगाव (Dharangav) येथील रहिवासी गणेश सूर्यभान वहाडणे (वय 24) रा.धारणगाव याचा मृतदेह (Dead Body) गोदावरी नदीत (Godavari River) तरंगताना आढळून आला असून सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीत गणेश कामाला होता.आप्पासाहेब कचरू वहाडणे यांच्या फिर्यादीवरून कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात (Kopargav Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
गणेश वहाडणे हे सिन्नर (Sinnar) तालुक्यातीलऔद्योगीक वसाहतीतील एका कंपनीत कामाला होते. शुक्रवारी रात्री त्यांची दुचाकी व बॅग धारणगाव-कुंभारी येथील गोदावरी नदीच्या पुलावर आढळून आली होती. शनिवारी सकाळी माजी नगरसेवक अनिल आव्हाड व त्यांच्या सहकार्यांनी बोटीतून नदीपात्रात शोध घेतला. मात्र गणेश आढळून आले नाही. यावेळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, इतर पोलिस कर्मचारी, नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे जवान व ग्रामस्थांनी शोध मोहिम राबविली होती.
रविवारी सकाळी गणेश वहाडणे यांचा मृतदेह (Dead Body) गोदावरी नदीतील (Godavari River) पाण्यात तरंगताना आढळून आला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. घटनेबाबत आप्पासाहेब कचरू वहाडणे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पूढील तपास ए.एम. आंधळे करीत आहेत.