
कोपरगाव | प्रतिनिधी
गोदावरी नदीच्या (Godavari River) पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने सर्व छोटेमोठे नदी नाले भरून वाहत आहेत. तसेच धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. (Kopergoan Rain Update)
परीणामी गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ-होऊन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे व रस्ता बंद होऊन अडचण होणार आहे. (Gadavari Water Level)
दरम्यान गंगापूर धरणातून (Gangapur Dam) २ हजार ९७० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर होळकर पुलाखालून (Holkar Bridge) ७ हजार ५१५ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.
नांदूरमध्यमेश्वरमध्ये (Nandurmadhyameshwar) ४५ हजार ६५४ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तर पालखेडमधून (Palkhed Dam) ८ हजार ५४४ क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. दारणा धरणातून (Darna Dam) २ हजार ७०८ क्युसेसने पाणी सोडण्यात आले असून कडवा धरणातून (Kadwa Dam) १ हजार ६८० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.