गोदावरीत 1009 क्युसेकने विसर्ग

गोदावरीत 1009 क्युसेकने विसर्ग
File Photo

अस्तगाव |वार्ताहर|Astgav

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर काल दिवसभर पावसाचे काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचे आगमन झाले. हा पाऊस खरिपाला जीवदान ठरणारा असला तरी धरणातील साठे (Dam Storage) वाढविण्यासाठी धुव्वाधार पावसाची गरज आहे.

नाशिक (Nashik) परिसरात व नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या पाणलोटात (watershed of Nandurmadhameshwar dam) पावसाने दमदार हजेरी लावल्याने या बंधार्‍यात पाण्याची आवक वाढल्याने त्यातून काल सायंकाळी 6 वाजता गोदावरी नदीत (Godavari River) जायकवाडीच्या (Jayakwadi) दिशेने 1009 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. पालखेड धरणातून (Palkhed Dam)काल दुपारी 400 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी रात्रीतून नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात (Nandurmadhameshwar Dam) दाखल होईल.

त्यामुळे आज सकाळी गोदावरीतील विसर्ग (Godavari Visarg) 1500 क्युसेक इतका होऊ शकतो. गंगापूर धरण (Gangapur Dam) परिसरात काल दिवसभरात सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत भिंतीजवळ 25 मिमी पावसाची नोंद झाली. अंबोलीला 30 मिमी तर त्र्यंबकला 13 मिमी पावसाची नोंद झाली. दिवसभरात गंगापूर (Gangapur) मध्ये 62 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे गंगापूरचा साठा काल सायंकाळी 6 वाजता 83.16 टक्के इतका झाला होता. 5630 क्षमतेच्या या धरणात 4682 दलघफू इतका साठा तयार झाला होता.

काल सकाळी 6 वाजता मागील संपलेल्या 24 तासांत गंगापूरला 35 मिमी पावसाची नोंद झाली. मागील 24 तासांत गंगापूर मध्ये 106 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे गंगापूरचा साठा काल सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत 82.03 टक्क्यावंरुन 83.16 टक्क्यांवर पोहचला आहे. गौतमी 27 मिमी, कश्यपीला 13 मिमी पावसाची नोंद झाली. कश्यपी धरणात 5 दलघफू तर गौतमीत 14 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. काल दिवसभर काश्यपीला 12 मिमी तर गौतमीला 13 मिमी पावसाची नोंद झाली. काश्यपी 57.34 टक्के तर गौतमी 68.68 टक्के भरले होते.

दारणाच्या पाणलोटात (watershed of Darna) कालपासून मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या सरी दाखल होत आहे. दोन दिवसांपासून घोटी (Ghoti), इगतपुरीला (Igatpuri) मध्यम पावसाचे आगमन होत आहे. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 22 मिमी, इगपुरीला 16 मिमी, घोटीला 12 मिमी पावसाची नोंद झाली. 24 तासांत दारणात 44 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. काल सकाळी दारणात 81.37 टक्के पाणीसाठा (Darna Water Storage) होता. काल त्यात काहीशी वाढ झाली. दारणातुन (Darna) 150 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. वालदेवीतुन 65 क्युसेक, भावलीतून 73 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. भाम धरण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यात काल सकाळी 6 वाजता 98.05 टक्के पाणीसाठा (Water Storage) होता. आळंदीतही 96.23 टक्के पाणीसाठा आहे. यापूर्वी भावली, वालदेवी, हरणबारी ही नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) तीन्ही धरणे यापुर्वीच 100 टक्के भरली आहेत. नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने धरणात समाधानकारक वाढ होणार नाही. यासाठी धुव्वाधार पावसाची गरज आहे.

गोदावरी (Godavari) कालव्यांच्या लाभक्षेत्रातील मागील 24 तासांतील पाऊस असा- पाऊस मिमी मध्ये- ब्राम्हणगाव 30, कोपरगाव 26, पढेगाव 47, सोमठाणा 16, कोळगाव 15, सोनेवाडी 9, रांजणगाव4, राहाता 8, असा पाऊस नोंदला गेला. खरीपाला जिवदान मिळाले असले तरी खरीपाच्या आवर्तनाची मागणी लोकप्रतिनिधी तसेच शेतकर्‍यांनी लावुन धरली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com