गोदावरी नदीपात्रातून फरांड्याच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा

गोदावरी नदीपात्रातून फरांड्याच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून फरांड्या च्या साह्याने बेसुमार वाळू उपसा होत असून वाळू तस्कराचे अधिकार्‍यांशी आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. गोदावरी नदी पात्रातील पाणी कमी होताच वाळू तस्करांनी अधिकार्‍यांशी आर्थिक हित संबंधाबाबत फराड्याच्या साह्याने हजारो ब्रास वाळू उपसा केल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.

नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अहमदनगर जिल्ह्यात वार्षिक आढावा बैठकीत गौण खनिज महसूल वाढवण्याच्या सक्त सूचना अधिकार्‍यांना देत अवैध गौण खनिज वापर व तस्करी यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. महसूलच्या अधिकार्‍यांनी या आदेशास हरताळ फासत वाळू तस्कराशी आर्थिक हित संधान बांधल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडून अधिकारी गब्बर तर गोदावरी नदी पात्र वाळू विना उजाड होत आहे.

शासकीय घरकुल योजनेच्या कामास वाळु उपलब्ध व्हावी यासाठी अनेक नागरिकांनी अर्ज विनंत्या महसूल दरबारी केल्या. मंत्रालय स्तरावर देखिल हा मुद्दा चर्चेत आला.मात्र घरकूल बांधकामास अधिकारी वाळू नियमानुसार उपलब्ध करून देऊ शकले नाही. तालुक्यातील बक्तरपूर, मांयगाव देवी, कुंभारी, चांदगव्हाण, गोदावरी नदी पात्रात शेकडो ट्रॅक्टर फरांड्या दिवस रात्र राजरोसपणे चालू आहे. अवैध गौण खनिज तस्करी रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकात मर्जीतील कर्मचारी वर्गाचा समावेश असून लिस्ट मध्ये नसलेल्या ट्रॅक्टर व फरांड्यावरच कारवाई केली जाते. शासनाने वाळू लिलावाचे नवीन लोकहितकारक धोरण निर्णयाची अंमलबजावणी होई पर्यंत या वेगाने असाच वाळू उपसा चालू राहिल्यास गोदावरी नदी पात्र वाळू विना उजाड होऊन शेती धोक्यात येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com