गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ

पुणतांबा - कोपरगाव वाहतूक बंद
गोदावरी नदी
गोदावरी नदी

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

गोदावरी नदीच्या (Godavari River) पाणी पातळीत (Water Level) बुधवारी रात्रीपासून वाढ झाल्यामुळे येथील काथ नाल्याच्या पुलावर (Kath Nala Bridge) अंदाजे चार फूटापेक्षा जास्त पाणी आल्यामुळे गुरुवारी पहाटेपासून पुणतांबा - कोपरगाव रस्ता (Puntamba Kopargav Road) वाहतूकीसाठी बंद (Traffic Closed) झाला आहे. तसेच पुणतांबा-शिर्डी रोडवरील (Puntamba Kopargav Road) पुलावरही तीन फूटापेक्षा जास्त पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

गोदावरी नदी
राहुरी तालुक्यात ढगफुटीसदृष्य पाऊस

पिंपळवाडी रोडवरील साहेबराव बनकर ययया दूध उत्पादकाने सकाळी सात वाजेच्या दरम्यान पुलावर असलेल्या तीन फूट पाण्यातून जाऊन रतिब असणार्‍या ग्राहकांना भर पावसातही दूध पोहच केले. येथील कोल्हापूर पद्धतीच्या वंसत बंधार्‍याच्या पुलावरूनही चार फुटापेक्षा जास्त पाणी पडत असल्यामुळे गोदावरी नदीकाठच्या डोणगाव, लाख, बापतरा सह अनेक गावांचा काल पुणतांबा गावाशी संपर्क बंद झाला. नदीकाठच्या शेकडो विद्यार्थी वर्गाला पुणतांबा येथे शाळेत येणे शक्य झाले नाही.

गोदावरी नदी
बाजार समितीच्या यादीतून परवाने असताना 40 ते 50 व्यापार्‍यांची नावे हेतुपुरस्सर वगळली

बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी पुणतांबा परिसरात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. जळगाव, रामपूरवाडी भागात पावसाचे प्रमाण जास्त होते. पावसामुळे अनेक शेतकर्‍यांच्या सोयाबीन पिकात एक फुटापेक्षा जास्त पाणी वाहत होते. ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकाची सोंगणी केली होती ते पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले. तसेच सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अस्तगाव, एकरुखे परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पुणतांबा परिसरातील ओढे नाले तुडूंब भरून वाहत आहे.

गोदावरी नदी
अघोषित व पात्र शाळांना 15 नोव्हेंबरपर्यंत अनुदानाचा निर्णय

ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आत्यामुळे येथील सुहास वहाडणे यांच्या 15 एकर सोयाबीनच्या शेतात 5 फुटापेक्षा जास्त पाणी होते. शेतकरी वर्गाचा खरीप हंगाम पूर्ण वाया जाण्याची शक्यता असून रब्बी हंगामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची येथील कृषी विभाग तसेच कामगार तलाठी यांनी तातडीने पंचनामे सुरु करावेत, अशी मागणी शिवसेनेचे सुहास वहाडणे, बाळासाहेब जाधव, दादासाहेब सांबारे, सुधाकर जाधव, अभय धनवटे, साहेबराव बनकर सह अनेक शेतकरी वर्गाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com