गोदावरीतून वाहिले 24.4 टीएमसी पाणी

नदीतून अजूनही विसर्ग सुरुच, पाऊस थांबल्याने सर्व धरणांचे विसर्ग घटले
गोदावरीतून वाहिले 24.4 टीएमसी पाणी
File Photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

पावसाचा वेग मंदावला असला तरी गोदावरी नदीत (Godavari River) विसर्ग सुरुच आहे. नांदूरमधमेश्वर (Nandurmadhameshwar) बंधार्‍यातून गोदावरीत (Godavari) 1 जून पासून काल सकाळपर्यंत 24.4 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल सायंकाळी गोदावरीतून (Godavari) 1614 क्युसेकने विसर्ग सुरू होता.

दारणातून (Darna) 550 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. गंगापूरचा (Godavari) विसर्ग काल सकाळी बंद करण्यात आला आहे. आळंदीतून (Alandi) 50 क्युसेक, पालखेड (Palkhed) 874 क्युसेक, वालदेवी (Waldevi) 50 क्युसेक व इतर पावसाचे पाणी असा विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात (Nandurmadhameshwar Dam) दाखल होत आहे. काल सकाळी 6 वाजता गोदावरी नदीत (Godavari River) 3155 क्युसेकने असलेला विसर्ग काल सायंकाळी 6 वाजता 1614 क्युसेक इतका करण्यात आला. गोदावरीचे (Godavari) दोन्ही कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी विसर्ग सुरू आहे. डावा कालवा 13 किमी अंतरात फुटल्याने त्याचा विसर्ग 4-5 दिवस बंद होता. तो पुन्हा काल सुरू करण्यात आला.

काल दिवसभरात सर्वत्र पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे नविन आवक कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) बहुतांशी धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. मुकणे 75.94 टक्क्यांवर स्थिर आहे. वाकी 97.23 टक्के, भोजापूर 59 टक्के, ओझरखेड 87.37 टक्के हे धरणं (Dam) वगळता अन्य सर्व धरणे 100 टक्के भरली आहेत. या हंगामात दारणात (Darna) 16.4 टिएमसी पाण्याची आवक झाली. तर या धरणातून 10.1 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गंगापूरमध्ये (Gangapur) 6.9 टिएमसी पाण्याची आवक झाली. तर या धरणातून 3.1 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. कडवा धरणात 2.5 टीएमसी पाण्याची आवक तर एक टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मागील वर्षी कालच्या तारखेला 94.47 टक्के पाणीसाठा नाशिकच्या धरणांमध्ये (Nashik Dam) होता. काल तो 95.10 टक्के इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.