
कोपरगाव | प्रतिनिधी
नाशिक जिल्हयात गंगापूर, धारणासह अनेक धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे.
यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन सुरक्षिततेसाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी जलसेतु (लहान पुल) प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला आहे.
दरम्यान गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पुणतांबा येथील काथ नाल्यावर पाणी आले असून पुणतांबामार्गे कोपरगाव व श्रीरामपूरकडे जाणारी वाहतूक सकाळी १० वाजे पासूनच बंद झाली आहे.
तसेच १२ वाजेनंतर गोदावरी नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या वंसत बंधार्याच्या पुलावरून पाणी पडण्यास सुरुवात झाल्यामुळे गोदावरी नदीकाठच्या औरंगाबाद जिल्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.