गोदावरी नदीला पूर; कोपरगावचा लहान पुल वाहतुकीसाठी बंद

पाणी पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी
गोदावरी नदीला पूर; कोपरगावचा लहान पुल वाहतुकीसाठी बंद

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यासह राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या पावसामुळे अनेक नदी- नाले तुडुंब भरून वाहू लागले आहे.चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.

सोमवारी (११ जुलै) दिवसभर मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस नाशिक शहरासह परिसरात सुरुच होता. यामुळे गोदावरीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातून नदीत आलेले पावसाचे पाणी आणि गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने गोदामाई ओसंडून वाहू लागली आहे.

प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात असून कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्धन स्वामी महाराज मौनगिरी सेतू (लहान पूल) वाहतुकीसाठी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. यावेळी शहरातील नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com