गोदावरी नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडेठाक

गोदावरी नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडेठाक

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

श्रीक्षेत्र पुणतांबा येथे उत्तर वाहिनी झालेल्या गोदावरी नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडेठाक पडले आहे.

विशेषतः योगीराज चांगदेव महाराज यांच्या समाधीजवळ पश्चिम बाजूला असलेल्या गोदावरी नदी पात्र तर पूर्ण कोरडे झाले आहे. श्रीक्षेत्र पुणतांबा येथे विविध धार्मिक विधी साठी येणारे ग्रामस्थ नदी पात्रात जेथे थोडे फार पाणी आहे अशा ठिकाणी तसेच काही डोहा जवळ धार्मिक विधी पूर्ण करतांना दिसत आहे. येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍याखाली नदीपात्र कोरडे झाले तरी बंधार्‍याच्या वरच्या बाजूला ब्राम्हण घाट, आहिल्याबाई होळकर घाट तसेच बोरबनापर्यंत नदी पात्रात अजून ही बर्‍यापैकी पाणी आहे. येथील कोल्हापूर पध्दतीचा वंसत बंधारा सर्वसाधारण दरवर्षी फेबुवारी महिन्यापर्यंत कोरडा पडतो. मात्र चालू वर्षी या बंधार्‍यात मे महिन्यापर्यंत पाणी टिकून राहण्याची शक्यता आहे.

गेल्या 15 वर्षात प्रथमच मे महिन्यापर्यंत पाणी टिकून राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोल्हापूर पध्दतीच्या वंसत बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाण्याचा उपसा केला जातो. चालू वर्षी गेल्या दोन-तीन महिन्यापासून परिसरात वीज पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे त्याचा परिणाम पाण्याच्या उपशावर झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी नदी पात्रात पाणी टिकून असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. परिसरातील गावतळे, छोटे मोठे बंधारे हे सुध्दा कोरडे ठाक पडले आहेत. असे असले तरी कुठेही पाणी टंचाई जाणवत नाही.

Related Stories

No stories found.