कोकमठाणच्या इसमाचा गोदावरीत मृतदेह आढळला

कोकमठाणच्या इसमाचा गोदावरीत मृतदेह आढळला

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरातून वाहणार्‍या गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली कोकमठाण येथील इसमाचा मृतदेह सायंकाळी आढळून आला आहे. गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली कोकमठाण येथील विशाल चंद्रकांत जपे (वय 40) यांचा मृतदेह असल्याची माहिती मूकबधीर शाळेच्या शिक्षकांनी अमोल चंद्रकांत जपे यांना दिली.

त्यांनी माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी ते मृत असल्याचे घोषित केले . यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com